डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांच्या मालमत्ता कर विषयी बिल आकारणी २०१७ साली जशी आकारली गेली तशीच आकारणी करण्यात यावी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचे २७ गावातील सर्व पक्षीय संघर्ष समितीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, मनसे आमदार राजू पाटील यांनी मागण्यांसाठी सकारात्मकता दाखविल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावातील नागरीकांना पुन्हा जून्या दराने मालमत्ता कर आकारणी केली जाणार आहे अशी माहिती २७ गावातील सर्व पक्षीय संघर्ष समितीने प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली. संघर्ष समितीच्या लढ्याला यश आले असून राज्य सरकारचे समितीतर्फे गजानन मांगरुळकर यांनी आभार मानले.
गजानन मांगरुळकर म्हणाले कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावातील नागरीकांना १० पट जास्त मालमत्ता कराची आकारणी केली जात होती. या कर आकारणीचे फेरमूल्यांकन करण्याकरीता राज्य सरकारने समिती नेमली होती. २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीने कर आकारणीविषयी २६५ पानांचे निवेदन दिले होते. त्यानंतर ७ मार्च रोजी पार पडलेल्या बैठकीत २७ गावातील भूमिपुत्र नागरीकांना २०१६-१७ सालानुसारच कर आकारणी केली जाईल असा निर्णय घेतला गेला. त्याचे इतिवृत्त प्राप्त झाले आहे त्यामुळे मालमत्ताधारकांना २०१६-१७ नुसार कर आकारणीची बिले दिले जातील अशी माहिती संघर्ष समितीचे पदाधिकारी गजानन मंगरुळकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.
यासंदर्भात समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, एकनाथ पाटील यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांच्यासह कर आकारणी विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांची भेट घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा