डोंबिवली : अलीकडेच पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघातानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारात कल्याण-डोंबिवलीत बारवर कारवाई सुरू केल्याचे दिसून येत आहे. मात्र कल्याण-डोंबिवलीत राजरोसपणे ढाब्यांवर सर्रास मद्यपान होत असताना फक्त बार वर कारवाई केल्याचा देखावा सुरू असल्याचे दिसून येत आहे. ही बार वर झालेली कारवाई देखील पुण्याच्या झालेल्या पोर्शे कार अपघाता नंतर सुरू करण्यात आलेली आहे. पुण्यात बार व पब्ज बाबत आमदार रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरल्याने कारवाई सुरू झाल्यावर कल्याण-डोंबिवलीत राज्य उत्पादन शुल्क खाते खडबडून जागे झाले असल्याची चर्चा आता या कारवाई वरून सुरू झाली आहे. या पूर्वी अनेक दिवस हे बार बिनदिक्कत कुणाच्या कृपाआशीर्वादाने सुरू होते या बाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. कुणाच्या आशीर्वादाने उत्पादन शुल्क विभाग या बार कडे कानाडोळा करीत होता की येथे ही उत्पादन शुल्क विभागास मोठा हप्ता पोहोचविला जात होता अशी चर्चा सर्वत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे. या बाबत एका जानकाराने दिलेल्या माहिती नुसार उत्पादन शुल्क व पोलीसांना मॅनेज केले जात असल्याने येथे मद्य पिण्यास दिले जात असल्याचे समजते.
डोंबिवलीत काही तरुण-तरुणी दारू पीत असताना आढळून आल्याने एका बारवर कारवाई करण्यात आली आहे. तर तीन बार आणि रेस्टॉरंटवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. जे बार नियम पाळणार नाहीत अशांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल असे उत्पादन शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी अनेक ढाब्यावर मद्य प्यायला दिले जात असताना या ढाब्यावर उत्पादन शुल्क विभाग लक्ष का देत नाही हे मोठे कोडे असल्याची चर्चा सुरू आहे. या बाबत पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी ज्या प्रमाणे उत्पादन शुल्क विभागाच्या कर्तृत्वाचा पाढा वाचला होता त्या मुळे पुण्या नंतर डोंबिवलीत ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने काही बारच्या वाढीव अनधिकृत बांधकामावर कारवाई करीत त्याचे शेड तोडले आहेत. पण अनेक बारची कागदपत्र तपासली गेली तर ते अनाधिकृत असल्याचे समोर येईल असे बोलले जात आहे.कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील अनेक बार व ढाबे अनधिकृत असताना त्यावर कारवाई होत नाही पण बार वर कारवाई केल्याचे व बातम्या छापून आणून बार वर कारवाईचे चित्र उभे केले जात आहे. त्यातच डोंबिवलीतील शिवसेना शहरप्रमुखाच्या जनसंपर्क कार्यालयाशेजारीच डाव्या बाजूस श्री दुर्गामाता देवीचे मंदिर आहे व उजव्या बाजूला वाईन शॉप असून त्याला लागुनच 'गेव एन जेम' रेस्टोबार आहे. शाळेच्या व मंदिराच्या काही मीटर अंतराच्या आत वाईन शॉप तसेच बार असू नये अशी उत्पादन शुल्क खात्याची नियमावली पायदळी तुडवत श्री दुर्गामाता देवीच्या मंदिराच्या काही फुटावर वाईन शॉप ला लागूनच बार सुरू करण्याला परवानगी मिळालीच कशी ? व नियम धाब्यावर बसवून कोणाच्या वरदहस्ताने ही परवानगी दिली गेली असा खडा सवाल व यावर उत्पादन शुल्क विभाग यावर कारवाई कधी करणार असल्याची चर्चा डोंबिवलीतील नागरिकांमध्ये सद्या सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा