डोंबिवली : ठाणे शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ-३ अंतर्गत येणाऱ्या ठाणे क्राईम ब्रांच अंतर्गत, कल्याण क्राईम ब्रँच युनिट-३, येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांची पदोन्नती होऊन त्यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर बढती मिळाली आहे. युनिट-३ कल्याण गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी यांनी शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले.
दत्ताराम भोसले हे गेल्या अनेक वर्षापासून पोलीस हवालदार म्हणून गुन्हे डिटेक्शन ब्रांचला कार्यरत आहेत. त्यांचे नेटवर्क चे जाळे खूप मोठे असून त्यांनी आतापर्यंत कल्याण-डोंबिवली मध्ये घडलेले अनेक मोठमोठे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. त्यांचे उत्कृष्ट डिटेक्शन व उत्तम कामगिरी व प्रामाणिक आणि निष्कलंक सेवा म्हणून त्यांना महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांचे मित्र मंडळी, आप्तेष्ट यांच्या सर्व स्तरातून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी मुळे सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून मिळालेल्या पदोन्नतीवर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा