भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा आणि भाजपचे पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत बाळ्या मामा यांचा अखेर विजय झाला असून ८२ हजारहून अधिक मताधिक्यांने ते विजयी झाले आहेत. त्यांना ४,६१,६६७ मते मिळाली. तर कपिल पाटील यांना ३,७९,०६४ मते मिळाली.
भिवंडी लोकसभा मतदार संघामध्ये प्रामुख्याने महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्यात प्रमुख लढत होत होती. त्यामुळे या मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलणार की तुतारीचा आवाज घुमणार, हे आता स्पष्ट झालं आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे निलेश सांबरे आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला एमआयएम पक्ष कुणाच्या मतांचे गणित बिघडवणार, हे पाहणे औत्सुक्याचे होते. त्याशिवाय, महाविकास आघाडीमधील स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या नाराजीचा फटका त्यांच्याच आघाडीच्या उमेदवाराला बसणार याबाबत चर्चा होती.
लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार तथा केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचा भास्कर भगरे यांनी पराभव केला. भगरे हे पण शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. दुसरीकडे पंचायत राज केंद्रीय मंत्री असलेले भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांचा देखील पराभव झाला. त्यांचा शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी पराभव करून सगळ्या विरोधी उमेदवारांची तुतारी वाजवली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा