BREAKING NEWS
latest

डोंबिवलीत टेम्पोच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोन चोरांच्या गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण शाखेने आवळल्या मुसक्या..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  दिनांक १९/०६/२०२४ रोजी गुन्हे शाखा,युनिट-३ कल्याणचे सहा.पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना त्यांच्या  गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सुहास उर्फ चिंग्या पाईकराव आणि रॉकी उर्फ मोनू चव्हाण यांनी टेम्पोच्या गाड्यांचे मोठ्या बॅटऱ्या कोठून तरी चोरून आणल्या असून त्या विकायला प्रीमियर कॉलनी मैदानाजवळ मानपाडा शिळ रोड, डोंबिवली पूर्व येथे दुपारी ३ ते ४ वा. दरम्यान येणार आहेत. तसेच  दोन्ही इसमांचे वर्णन सांगितले अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट-३ कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांना कळविताच त्यांनी ताबडतोब एक पथक सपोनि. संदीप चव्हाण, सपोउपनि. दत्ताराम भोसले, पोहवा. बालाजी शिंदे, गुरुनाथ जरग, मिथुन राठोड व चालक पोहवा. बोरकर यांना बातमी मिळाल्या ठिकाणी तात्काळ रवाना केले.

सदर ठिकाणी गुन्हे शाखा, युनिट-३ कल्याण च्या वरील पथकाने सापळा रचला असता सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे दोन इसम प्रवासी रिक्षातून उतरले तसेच सदर दोन इसमांकडे दोन गोण्यांमध्ये काही तरी जड वस्तू असल्याचे दिसून आल्याने ते इकडे तिकडे कावरे बावरे पाहत असताना पोलिसांना तेच इसम असल्याची खात्री झाल्याने त्यांना पळून जाण्याचा मोका न देता घेराव करून ३.३० वाजता जागीच रंगेहाथ पकडले. त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता इसम नामे सुहास उर्फ चिंग्या विजय पाईकराव (वय:२१ वर्षे) रा. इंदिरानगर झोपडपट्टी शेलार नाका डोंबिवली (पूर्व), व रॉकी उर्फ मोनू रमेश चव्हाण (वय: १८ वर्षे) रा. त्रिमूर्ती नगर झोपडपट्टी शेलार नाका डोंबिवली (पूर्व) असे सांगितले असून सदरच्या दोन्ही गोण्या उघडून पाहता ऍमरॉन कंपनीच्या दोन बॅटऱ्या एक्साईड कंपनीच्या एक बॅटरी असे एकूण ३ मोठ्या बॅटऱ्या त्यांच्या ताब्यात सापडल्या असून सदरच्या बॅटऱ्यांबाबत विचारले असता त्या विक्री करण्याकरिता आलो असल्याची सांगितले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता सदरच्या मोठ्या बॅटऱ्या या स्मशानभूमी चौक शेलार नाक्याजवळ डोंबिवली (पूर्व) येथून दोन ऍपे टेम्पो व एक टाटा टेम्पोच्या बॅटऱ्या चोरल्याचे कबूल केले. 
सदर बाबत टिळक नगर पोलीस स्टेशनला खात्री केली असता टिळक नगर गु.र.नं. १९७/२०२४ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदरचा गुन्हा उघडकीस आला असून सदर आरोपी कडून चोरीस गेलेल्या ३ बॅटऱ्यांची किंमत एकूण ८०००/- रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन नमूद आरोपी व मुद्देमाल टिळक नगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देऊन दोन आरोपीस अटक करून असे बॅटऱ्या चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपास टिळक नगर पोलीस स्टेशन चे सपोउपनि सोनावणे करत आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत