BREAKING NEWS
latest

राज्य सरकारकडून गौरी गणपती उत्सवानिमित्त मिळणार 'आनंदाचा शिधा'..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : येत्या २ ते ३ महिन्यांत विधानसभेच्या निवडणूक होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आहे. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाचा फटका बसू नये. यासाठी राज्यातील महायुती सरकारने राज्यातील गोरगरीब जनतेला गणेशोत्सवाचा सण आनंदाने साजरा करता यावा यासाठी आनंदाचा शिधा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य जनतेला १०० रुपयांत 'आनंदाचा शिधा' मिळणार आहे. या आनंदाच्या शिधाचा जिल्ह्यातील सुमारे ७ ते साडेसात लाख लाभार्थी यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 

गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी १ किलो रवा, चनाडाळ, साखर, व १ लिटर तेल असा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. हा 'आनंदाचा शिधा' १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत वितरीत केला जाणार आहे. यासाठी पॉस प्रणालीद्वारे १०० रुपये रास्त भावात लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने ५६० कोटी रुपयांच्या खर्चास नुकतीच् मान्यता दिली असून तसे परिपत्रक काढले आहे. लोकसभेत महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाचा फटका बसला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत.

महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजणा सुरू करून प्रत्येक पात्र महिलांना १ हजार ५०० रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी राज्यासह जिल्ह्यात युध्द पातळीवर काम सुरु आहे. आता सर्वसामान्य जनतेला खुश करण्यासाठी गोरगरीब जनतेला गणेशोत्सवाचा सण आनंदाने साजरा करता यावा यासाठी आनंदाचा शिधा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य जनतेला १०० रुपयात आनंदाचा शिधा मिळणार आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत