कल्याण : मागील काही दशकांपासून कल्याण-शीळ रस्त्यातील काही बाधित शेतकरी भूमिपुत्रांना मोबदला मिळाला नव्हता. याकरिता या शेतकऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी ५४ दिवसांचे बेमुदत धरणे आंदोलन यशस्वीरित्या केले होते. यातील मौजे निळजे येथील रस्ता बाधित पहिल्या शेतकरी कुटुंबाला आज रोजी ०२ कोटी ६१ लाख २५ हजार रुपये इतक्या मोबदल्याच्या रकमेचा धनादेश रजिस्ट्रेशन सह दुय्यम निबंधक कार्यालय कल्याण-२ या ठिकाणी अदा करण्यात आला.
बंधूंनो, "खाजगी एजंटांना कमिशन दिल्याशिवाय भूसंपादनाची रक्कम मिळत नाही" ही एक अफवा आहे कारण आज आम्ही खाजगी दलालांची कोणतीही मदत न घेता मोबदल्याच्या संपूर्ण रकमेचे रजिस्ट्रेशन केले असून भूसंपादनातील मोबदल्याची संपूर्ण रक्कम ही प्रकल्प बाधित शेतकरी भूमिपुत्रालाच मिळणार आहे. कल्याण-शीळ रस्ता बाधितांना मोबदला मिळावा याकरिता स्थानिक खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांनी रस्ता बाधितांना खूप सहकार्य केले आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. तसेच या संघर्षामध्ये संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व रस्ता बाधित शेतकरी, भूमिपुत्रांनी जी मेहनत घेतली, साथ दिली त्याबद्दल सर्व पक्षीय युवा संघटनेचे गजानन पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा