वार्ताहर: संदिप कसालकर
मुंबई, २२ जुलै २०२४: जोगेश्वरी पूर्व येथील गुणवंत शिक्षक अंकुश परब सर यांच्या पवित्र स्मृती जाग्या करण्यासाठी शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचा दातृत्त्वाचा वारसा पुढे नेण्यासाठी अंकुश सर प्रतिष्ठान गेली तीन वर्ष सातत्याने सामाजिक उपक्रम राबवून आपल्या प्रिय शिक्षकास गुरुवंदन करीत आहेत. यंदाच्या गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथील उसगाव या जिल्हा परिषदेच्या शाळेतील १०० आदिवासी विध्यार्त्याना त्यांच्या मागणीनुसार शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी अंकुश सर प्रतिष्ठान बरोबर जय हिंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना NSS चे विद्यार्थी यांनी देखील या सेवत सहभाग घेतला.
या शुभ प्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर दातृत्वाचा वारसा पुढे नेवून गुरु शिष्याची परंपरा पुढे नेल्यास भारत नक्कीच विचाराने आचाराने समृद्ध होईल, त्याची सुरुवात झाली पाहिजे म्हणूनच ह्या कार्यक्रमाचे आयोजन करत असल्याचे अंकुश सर प्रतिष्ठानच्या संचालिका, सहा. प्राचार्य जय हिंद कॉलेज डॉ. संगिता अंकुश परब यांनी सांगितले. तर ग्रामीण भागातील दुर्लक्षित विद्यार्थ्य्याना कुठे ही काही कमी पडू नये म्हणून आम्ही हे कार्यक्रम या पुढे अधिक प्रभावीपणे राबवू असे प्रतिष्ठानचे विश्वस्त अनिल म्हसकर यानी सांगितले. सरांचा हा वारसा आम्ही नक्कीच पुढे नेवू त्यात खंड पडणार नाही याची ग्वाही प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.
या शुभ प्रसंगी लवू परब सर, डॉ. संगिता परब. उपप्राचार्या जय हिंद कॉलेज, लेखा परब, विवेक सावंत, वनिता विवेक सावंत, राकेश सावंत, तेजल सावंत, राष्ट्रीय सेवा योजनाचे डॉ. बाळकृष्ण रंगोली, क्षमा म्हसकर, अरविंद जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे विध्यार्थी अर्नब समराह, रुद्रा मांगे,सूची पाटील, काव्यश्री मुकेश इत्यादि उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा