BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेत २०२४ च्या अर्थ संकल्पाबाबत चर्चासत्राचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : 'बजेट' म्हणजेच अर्थसंकल्प किंवा होणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक. २३ जुलै रोजी माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांनी 'सातवा अर्थसंकल्प' संसदेत सादर केला. ही अंतदृष्टीपूर्ण चर्चा अर्थसंकल्प विकसित राष्ट्र बनवण्याच्या भारताच्या वाटचालीवर त्याच्या परिणामांवर लक्ष केंद्रित करते. दिनांक २४ जुलै रोजी 'जे एम एफ' संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे यांनी देखील मधुबन वातानुकुलीत दालनात 'अर्थसंकल्प' या अभूतपूर्व विषयावर चर्चासत्र भरवले.
शाळा महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी मिळून साधारण ३०० ते ३५० लोकांनी मधुबन दालन खचाखच भरले होते. 'बजेट' म्हणजे काय ? याची व्याख्या सांगताना, ठराविक कालावधीत तुम्ही किती पैसे कमवावे किंवा वाचवावे याची गणना करण्याची प्रक्रिया आणि तुम्ही ते कसे खर्च कराल ह्याचे नियोजन करणे म्हणजेच आपल्या वर्षभराचे खर्चाचे अंदाजपत्रक म्हणजेच 'बजेट' अर्थात 'अर्थसंकल्प'. असे सहज सुलभ भाषेमध्ये संस्थेचे  अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी जमलेल्या उपस्थित समुदायाला सांगीतले. 
दरवर्षी प्रत्येक गोष्टींमधे वस्तूंच्या दराचा चढ उतार होत असतो. कधी कधी जीवनावश्यक वस्तूंचा दर वाढून त्या महागल्या जातात, तर चैनीच्या वस्तूंचे दर कमी होऊन त्या स्वस्त होतात. याचाच अर्थ असा आहे की गरीब हा गरीबच न राहता, श्रीमंत अधिक  गब्बर श्रीमंत न होता मध्यम वर्गीयांसाठीही हा अर्थसंकल्प सुलभ आणि फायदेशीर असा आहे, असे वक्तव्य करून डॉ. राजकुमार कोल्हे यांनी या गोष्टीला दुजोरा दिला की तळागाळातील सर्व लोकांना विचारात घेऊन, त्यांना समोर ठेऊन केंद्र सरकारने यंदाचा अर्थसंकल्प मांडला आहे. शालेय विद्यार्थ्यांनी देखील आई वडिलांनी दिलेले पैसे हे कसे नियोजन पूर्वक वापरावेत याचीही  माहिती करून घेणे गरजेचे आहे.
घरातील स्त्री म्हणजेच गृहिणी हीच खरी अर्थसंकल्प रचणारी आणि हाताळणारी खरी महिला आहे.असे संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगून अशिक्षित आई देखील महिन्याचे, वर्षभराचे घरातल्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करत असते व त्याप्रमाणे नियोजन करून घरखर्च ठरवत असते. राजकीय दृष्ट्या अर्थसंकल्प हा देशाभराचा फायद्या तोट्याचा असू शकतो, परंतु घर चालवणारी स्त्री ही नेहमीच खर्चाचे अंदाजपत्रक आखून आपल्या फायद्याचाच विचार करत असते असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपले मत मांडले.
दोन तासाच्या चर्चासत्रात अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शंका, प्रश्न विचारले, त्यांची समर्पक उत्तरे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी मुलांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एकनाथ चौधरी यांनी केले तर सौ. श्रेया कुलकर्णी यांनी वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत