कल्याण : भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी नुकतीच कल्याण रेल्वे स्थानकाची पाहणी केली. कल्याण रेल्वे स्थानक आणि त्याबाहेरील परिस्थिती सुधारावी यासाठी रेल्वे स्थानकांच्या कर्मचाऱ्यांना तंबी दिली गेली होती. त्यामुळे लवकरच कल्याण रेल्वे स्थानक सुधारेल अशी कल्याणकरांची आशा आहे. आता कल्याण-डोंबिवलीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महिलांचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण व्हावे आणि त्याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांना कर आणि पाणीपट्टी देयके वेळेत मिळण्यासाठी महाराष्ट्र शासन अंगीकृत महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत महिला बचत गटातील महिलांमार्फत प्रत्येक प्रभाग कार्यालय पातळीवर बिलांचे वाटप करण्यात यावे असा महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांचा मानस होता.
त्यानुसार, सन २०२४- २०२५ या आर्थिक वर्षातील कर आणि पाणीपट्टी देयके महिला बचत गटामार्फत वाटपाचे काम सुरु करण्यात आले. नागरीकांना वेळेत बिले प्राप्त झाल्याने, या उपक्रमास नागरीकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ३१ जुलै पुर्वी करदात्यांनी मालमत्ता कर भरल्यास मालमत्ता करात (शासकीय कर वगळून) ५% सवलत मिळणार आहे. कराच्या बिलावरील क्यूआर - कोड द्वारे तसेच ऑनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, ३१ जुलैपर्यत सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी महानगरपालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. तरी, आपल्या कराचा भरणा दि.३१ जुलै पुर्वी भरून, २% शास्तीच्या सवलतीचा लाभ घ्यावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन 'कर निर्धारण व संकलन विभाग' यांच्यामार्फत करण्यात आले आहे. वेळेत शिल्लक असलेला कर आणि थकबाकी मुक्त रहा असे आवाहन उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी केले आहे.
डॉ.इंदुराणी जाखड यांची जेव्हापासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे. तेव्हापासून केडीएमसीच्या कामाला वेग आला आहे. कल्याण-डोंबिवलीमधील अपुऱ्या कामाला गती मिळाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा