BREAKING NEWS
latest

१० व्या इंडो-नेपाल आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत डोंबिवलीच्या मीना घनवट आणि राधिका केतकर यांनी पटकाविले सुवर्णपदक..

                         
प्रतिनिधी: अवधुत सावंत


डोंबिवली : नुकत्याच दिनांक २९ जून २०२४ रोजी नेपाळची राजधानी, काठमांडू येथील 'बोगनविला हॉल' मध्ये झालेल्या १० व्या 'इंडो - नेपाल आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धा २०२४'  मध्ये डोंबिवलीकर असलेल्या ४८ वर्षीय सौ.मीना घनवट यांनी ४० ते ५० वयोगटात तर ६३ वर्षीय सौ.राधिका श्रीकृष्ण केतकर यांनी ५० ते ६५ वयोगटातील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत  सुवर्णपदक पटकाविले. ही स्पर्धा पारंपारिक योगासन, रिदमीक एकेरी व दुहेरी अश्या प्रकारात घेण्यात आली होती.
                                 
                                  
                                  
स्पर्धेचे उद्घाटन हे 'नेपाळ ऑलीम्पिक असोसिएशन' चे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री.राजेश श्रेष्ठ यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी इंडो - नेपाळ योगासन स्पर्धेचे को-ऑर्डीनेटर श्री.सुरेश गांधी, नेपाल योगा कलचर असोसिएशनचे सचिव श्री.संतोष श्रेष्ठ, नेपाळ योग् विद्या प्रमुख सौ.सुषमा पोडेल मॅडम, तांत्रिक समिती प्रमुख ज्योत्स्ना रायरीकर, पंच प्रमुख सौ.अभिश्री राजपूत व वैशाली मिटकरी, आंतरराष्ट्रीय पंच सौ.अल्पना पांडे व सौ.शोभा पाटील यांची उपस्थिती होती.
                                                                            
      
                                
या स्पर्धेला भारताकडून ४४ स्पर्धकांनी भाग घेतला तर नेपाळ च्याही २९ स्पर्धकांनी भाग घेतला होता. भारताने पारंपारिक योगासन स्पर्धेमध्ये १४ सुवर्ण तर रिदमीकच्या स्पर्धेमध्ये ६ सुवर्ण पदके मिळवीत स्पर्धेवर वर्चस्व गाजविले. स्थानिक डोंबिवलीकर असलेल्या सौ.मीना घनवट व सौ.राधिका केतकर यांनी नेपाळ येथें झालेल्या १० व्या 'इंडो - नेपाल आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धा २०२४' मध्ये सुवर्णपदक पटकावून डोंबिवलीकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्या बद्दल त्यांच्यावर  डोंबिवलीकरांकडून व सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रामदेव बाबा यांच्या प्रेरणेने याआधी मलेशिया, थायलंड आणि आता नेपाळ मध्ये सुवर्णपदक मिळाल्याने आणि देशाचे प्रतिनिधीत्व करता आले हे अभिमानास्पद असून खूप आनंद झाला. आपल्या सरकारने योग विद्याच्या ज्या काही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत असतात ते स्पर्धक आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत असतात त्यासाठी सरकारने याचा विचार करावा असे सुवर्णपदक विजेत्या सौ.मीना घनवट आणि सौ.राधिका श्रीकृष्ण केतकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत