BREAKING NEWS
latest

पूरपरिस्थिती मुळे कोल्हापुरात हलवले सांगलीतील कैदी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
सांगली : संभाव्य पूरपरिस्थिती मुळे, सांगली तुरुंगातील कैदी कोल्हापूरच्या कळंबा तुरुंगात  हलवले आहेत. सध्या ८० कैदी पाठवले असून उर्वरित कैदी पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे. सांगलीतील पूरपरिस्थिती गंभीर बनत चालली आहे. वारणा आणि कोयना नदीतून सततच्या वाढत्या विसर्गामुळे सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी ३९ फुटावर जाऊन पोहोचली आहे.

अशीच परिस्थिती राहिली तर २०१९ च्या महापुरामध्ये जसे पुराचे पाणी जेलमध्ये शिरले होते. त्याप्रमाणे परिस्थिती उद्भवू शकते. या पार्श्वभूमीवर या वर्षी सांगली कारागृह प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कैद्यांना कोल्हापूरच्या कळंबा तुरुंगामध्ये पाठवले आहे. आज पहिल्या फेरीत ८० कैद्यांना पाठवण्यात आले आहे. यामध्ये २० स्त्रिया असून ६० पुरुष कैद्यांचा समावेश आहे. उर्वरित कैद्यांना पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे . कारागृहातील सर्व रेकॉर्ड, लॅपटॉप, कॉम्प्युटर्स, धान्य, भाज्या, औषधे, कपडे इत्यादी सामुग्री सुरक्षित स्थळी ठेवण्यात आली असून कारागृह प्रशासन कृष्णा नदीच्या महापुरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस तोंड देण्यास सज्ज झाली आहे. अशी माहिती कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत