BREAKING NEWS
latest

अक्षता म्हात्रे हिला जलद गतीने न्याय मिळावा अशी मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डायघर दि. १५: आज दि. १५ जुलै २०२४ रोजी दुपारी कल्याण ग्रामीण मनसे चे आमदार राजू पाटील यांनी शिळ डायघर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वरिष्ठ निरीक्षक संदिपान शिंदे यांची भेट घेतली. अक्षता कुणाल म्हात्रे हिला न्याय मिळावा तसेच दोषीला फाशीची शिक्षा व्हावी. आणि त्या २ वर्षांच्या लहान मुलांना आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी ही भेट होती. खटला जलद गतीने फास्टट्रॅक कोर्टात वर्ग करावा अशी मागणी यावेळी कल्याण ग्रामीण मनसे चे आमदार राजू पाटील यांनी शिळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांच्याकडे केली. यावेळी आगरी समाजातील आणि इतर समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत