BREAKING NEWS
latest

डोंबिवलीतील गृहनिर्माण संस्थांना मिळणार सोलर पॉवर युनिट..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
 
डोंबिवली दि.०७: डोंबिवलीतील गृहनिर्माण संस्थांमधील सार्वजनिक वापराच्या विजेसाठी सोसायटीला वीजबिल जास्त येते आणि हा वीज दर सतत वाढत असतो. वाढीव वीजबिलाचा भुर्दंड टाळण्यासाठी सोलर पॉवर युनिट देण्यात येणार असून सोलर पॉवर कंपन्या आणि गृहनिर्माण संस्था यांच्यात दीर्घकालीन सहकार्य करार करण्यात येणार आहे. सोलर पॉवरच्या माध्यमातून हाऊसिंग सोसायटीला स्वतःची वीजनिर्मिती करता येणार आहे. 
सोलर पॉवर उपकरण निर्मितीत असलेल्या वेगवेगळ्या आघाडीच्या कंपन्यांना आमंत्रण दिले असून डोंबिवलीतील गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी सुध्दा आज सावित्रीबाई फुले नाट्यगृह मध्ये उपस्थित राहिले होते. डोंबिवलीचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही योजना आणली आहे. 
या योजनेअंतर्गत अनेक सोलर कंपन्या येथे गुंतवणूक करणार आहेत. विजेचे बिल जास्त येणे किंवा लाईट जाणे हा विजेचा लपंडाव जो सुरू असतो यापासून डोंबिवलीकरांनां आता मुक्ती मिळणार आहे. भविष्यात वीज बिल कमी करण्यासाठी एक राष्ट्रीय कार्याची व योजनेची सुरुवात ही डोंबिवलीत सुरू होत  आहे. डोंबिवलीचे अनुकरण राज्यात मग देशात आणि नंतर जगात असं अनेक उपक्रमातून दिसून आलाय हाच उद्देश भारतात कौतुकाचा विषय हाईल असे राज्याचे बांधकाम मंत्री व डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत