कल्याण : बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ८६/२०२१ एन डी पी एस कायदा १९८५ कलम ८ (क) २१( क ) व २९ (नार्कोटिक्स) या गुन्ह्यामधील मागील चार वर्षापासून पासून फरार असलेला आरोपी नामे सैफ सिकंदर बुरहान हा कल्याण येथील एपीएमसी मार्केट येथे येणार असल्याची गुप्त बातमी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सचिन साळवी यांना मिळाली.
सदरची बातमी लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला व गुन्हे डिटेक्शन ब्रांच चे सपोनि. नवनाथ रूपवते व डिटेक्शन टीमचे सपोउनि. सुरेश पाटील, पोहवा. सचिन साळवी, प्रेम बागुल, पोशि. अरुण आंधळे यांनी फरार आरोपी सैफ सिकंदर बुरहन (वय: ३८ वर्षे) राहणार, गुलमोहर अपार्टमेंट, राबोडी ठाणे. याला शिताफीने ताब्यात घेतले व बेड्या ठोकल्या. सदर गुन्ह्याचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस स्टेशन चे सपोनि. नवनाथ रूपवते करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा