कल्याण : गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांना दिली. यासाठी सुमारे रु.२२ कोटींची तरतुद करण्यात आली असून,१५ एजन्सींची नेमणूक या कामासाठी करण्यात आली आहे. कालावधी कमी असल्यामुळे काही ठिकाणी यासाठी पेव्हरब्लॉकचा वापर केला जाणार आहे. पुढील वर्षी जास्तीत जास्त नागरीकांना शाडूची श्रीगणेश मूर्ती घेण्यासाठी प्रवृत्त करणे आणि महापालिका परिक्षेत्रातील मूर्तीकारांनी शाडूच्याच मूर्ती बनविणे, यासाठी एनजीओंची मदत घेवून नियोजन करण्यात येईल, अशीही माहिती डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी यावेळी दिली.
महापालिका क्षेत्रात श्रीगणेशोत्सवातील विविध परवानग्यासाठी दि २३ ऑगस्टपासून प्रभागनिहाय एक खिडकी योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे 'राईट टू पी' ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याासाठी बीओटी तत्वावर शौचालये बनविण्याचा प्रस्ताव असून, महिलांसाठी 'प्री फॅब्रिकेटीड टॉयलेट्स' बनविण्याची योजना प्रस्तावित करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी यावेळी दिली. तसेच महापालिका शाळा, उद्याने व रुग्णालये याठिकाणी सीसीटीव्ही लावणेबाबत नियोजन करण्यात येत आहे, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा