नाशिक : कांद्याचे बाजारभाव सध्या टिकून असून रोज कांद्याचे भावात सुधारणा होत आहे. नाशिक जिल्हात ज्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पाणी होते त्या ठिकाणाचा कांदा चांगला भाव खावुन जात आहे. महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर, सातारा हेक्टरी कांदा पिकविण्याबाबत प्रसिध्द आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्दा काही जिल्ह्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रात नव्हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्यात प्रसिध्द आहे. एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रातील ३७ टक्के तर भारतातील १० टक्के कांद्याचे उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात घेतले जाते.
कांद्याची वाढती मागणी आणि कांद्याची तुटवडा लक्षात घेता कांद्याचे भाव अजून वाढत जाणार आहे. नाशिकच्या कांद्याची चव ही सर्वात श्रेष्ट असल्यामुळे कांद्याची मागणी वाढत आहे. त्याच बरोबर देशामध्ये कांद्याची मागणी टिकून आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या सर्वात जास्त कांदा निफाड तालुक्यातून येत आहे. इतर तालुक्यात मात्र कांदे उपलब्ध नाही. काही ठिकाणी येवला तालुक्यात कांद्याचे पिक आहे. नाशिक जिल्ह्यात मागील वर्षी प्रचंड दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्यांचे पूर्ण हाल झाले. शेतकरी जेव्हा कांदा पिकवितो तेंव्हा त्याला कांद्याला भाव राहत नाही अशी स्थिती नेहमी होते. कांद्याला जेंव्हा २०० रुपये भाव क्विंटला मिळतो तेंव्हा मात्र शहरी लोकांच्या डोळ्यात पाणी येत नाही. शहरी लोकांनी हे समजून घेतलं पाहिजेत कांद्याचा भाव हा मोत्या पोवळ्या सारखा असता, कधी वाढला तर वाढला नाहीतर सरसरी १००० रुपये शेतकऱ्यांना विकावा लागतो.
सध्याच्या घडीला राज्यातील पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला उच्चांकी ४१०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. याशिवाय उमराणे बाजार समितीमध्ये देखील कांद्याला ४००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे आणि टप्पा गाठला आहे. तर राज्यातील अन्य सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला सध्या ३७०० ते ३८०० रुपये प्रति क्विंटलहुन अधिक दर मिळत आहे. ज्यामुळे आता कांदा दरात वाढ झाल्याने उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
लाल कांदा बाजारात येण्यासाठी अजून उशीर लागणार आहे. कांद्याची वाढती मागणी आणि नवीन कांदा बाजारात येण्यासाठी होणारा उशीर यामुळे कांदा ५ हजाराचा टप्पा गाठणार आहे. असे अभ्यासकांचे मत आहे. दुष्काळामुळे कांद्याचे उत्पादन घटले आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा