BREAKING NEWS
latest

डोंबिवली पोलिसांकडून मोटार सायकल चोरी करणारा सराईत आरोपी काही तासांत जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली पोलीस ठाणे गु.रजि नं. ७९१/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (ब) प्रमाणे दिनांक १४/०८/२०२४ रोजी ००.४५ वा. गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील फिर्यादी हेमंत धिरजलाल वाडेल (वय: ४१ वर्षे), धंदा-व्यवसाय, राहणार: भानु को.हौ.सो, सी/३४ शहीद भगतसिंग रोड, डोंबिवली पुर्व, यांनी दिनांक १३/०८/२०२४ रोजी सांयकाळी ०६:३० वा.च्या दरम्यान ओम सुवृत्ती को.हौ.सो, राजाजी पथ, डोंबिवली पुर्व येथे आपली २५,०००/- रुपये किंमतीची होंडा कंपनीची ड्रीम युगा मोटारसायकल नं. एमएच-०५ सीएन ५९७२, ही सोसायटीच्या मोकळया जागेमध्ये पार्क करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीने चोरून नेली म्हणुन सदरचा गुन्हा दाखल आहे.
नमुद गुन्ह्यातील आरोपी हा अज्ञात असल्याने, तसेच गुन्हा करताना घटनास्थळावर त्याने कोणताही मागमुस ठेवला नसल्यामुळे गुन्ह्याचा छडा लावणे हे एक मोठे आव्हान पोलीसांसमोर होते. परंतु पोलीसांनी सदरचे आव्हान स्विकारून, नमुद गुन्ह्याचा तपास चालु केला. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनास्थळाच्या आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याचे फुटेज पोशि. राठोड यांनी प्राप्त करून, आरोपीची ओळख पटवुन सदर आरोपी हा   डोंबिवली पूर्वेकडील केळकर रोड वरील तलप चहाचे बाजुला असल्याची पोहवा. विशाल वाघ यांना दिनांक १४/०८/२०२४ रोजी मिळालेल्या गुप्त बातमीचे अनुषंगाने सपोनि. बळवंत भराडे, पोउनि. केशव हासगुळे, पोहवा. विशाल वाघ व इतर अंमलदार असे सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता, सराईत गुन्हेगार नामे राम रमेश पोटे (वय;२४ वर्षे), राहणार: गजानन चाळ, रूम नं.३, कोपर, आयरेगाव, डोंबिवली पुर्व हा तलप चहाचे बाजुला, केळकर रोड, डोंबिवली पूर्व येथे असल्याने, त्यास पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन जाण्याचे प्रयत्नात असताना, त्यास पळुन जाण्याचा वाव न देता, जागीच १८:३० वा. च्या सुमारास ताब्यात घेवुन, डोंबिवली पोलीस ठाणे येथे हजर केले. त्याचेकडुन नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेली २५,०००/- रूपये किंमतीची होंडा कंपनीची ड्रीम युगा मोटारसायकल हस्तगत केली आहे. नमुद आरोपी याचा गुन्हेगारी अभिलेख तपासुन पाहिला असता, त्याच्यावर १) शिवाजीनगर पोलीस ठाणे, मुंबई, गु.रजि नं. ५०९/२०२० भा.द.वि.क.४५४, ३८०, २) घाटकोपर पोलीस ठाणे, गु.रजि नं. ९०/२०२३ भा.द.वि. क.३७९ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारे सराईत आरोपीत यास गुन्हा दाखल होताच काही तासांच्या आत अटक करून, नमुद गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरचा गुन्हा सहायक पोलीस आयुक्त मा. सुहास हेमाडे, डोंबिवली विभाग, वपोनि मा. गणेश जावदवाड, पोनि. पंकज भालेराव (गुन्हे) डोंबिवली पोलीस ठाणे यांच्या  मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा सपोनि. बळवंत भराडे, पोलीस उपनिरी. केशव हासगुळे, पोहवा. विशाल वाघ, सचिन भालेराव, प्रशांत सरनाईक, दत्तात्रय कुरणे, पोना. दिलीप कोती, शरद रायते, पोशि. देविदास पोटे, पोशि. शिवाजी राठोड, मंगेश विर यांनी उघडकीस आणला आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत