डोंबिवली : डोंबिवली पोलीस ठाणे गु.रजि नं. ७६९/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५, ३३१(४) प्रमाणे दिनांक २४/०७/२०२४ रोजी १९:२६ वा. गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे लिलाधर पद्मनाभ सालियान (वय: ५८ वर्षे) धंदा नोकरी, राहणार: बी/००२, श्री अन्नपूर्णा पुजा बिल्डीग, आयरे रोड तुकाराम नगर, डोंबिवली पूर्व, यांच्या राहत्या घरी दिनांक २४/०७/२०२४ रोजी रात्रौ ००:३० वा. ते पहाटे ५:०० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने राहत्या घरातील देवघरासाठी असलेल्या हॉल मधील खिडकी उघडुन त्यावाटे घरात प्रवेश करून घराचे हॉलमधील लोखंडी कपाटातील एकुण १,६४,०८०/- रूपये किंमतीची सोन्या व चांदीचे दागिने घरफोडी चोरी करून नेले म्हणुन सदरचा गुन्हा दाखल आहे.
नमुद गुन्ह्यातील आरोपी हा अज्ञात असल्याने, तसेच गुन्हा करताना घटनास्थळावर त्याने कोणताही मागमुस ठेवला नसल्यामुळे गुन्ह्याचा छडा लावणे हे एक मोठे आव्हान पोलीसांसमोर होते. परंतु पोलीसांनी सदरचे आव्हान तत्परतेने स्विकारून, नमुद गुन्ह्याचा तपास चालु केला. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनास्थळाच्या आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही फुटेज पोशि. राठोड यांनी प्राप्त करून, आरोपीची ओळख पटवुन, पोहवा. विशाल वाघ यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या अनुषंगाने पोउनि. केशव हासगुळे, पोहवा. विशाल वाघ व इतर अंमलदार असे सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता आरोपी नामे आकाश चंद्रकांत मोरे, (वय: २३ वर्षे), रा. रूम नं.४०४, दत्तनगर वसाहत, दत्तनगर, डोंबिवली पूर्व, यास पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन जाण्याचे प्रयत्नात असताना, त्यास पळुन जाण्याचा वाव न देता, ताब्यात घेतले. दिनांक १७/०८/२०२४ रोजी ००:४९ वा. अटक केली आहे. त्याच्याकडुन नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेले रुपये १,६४,०८०/- किंमतीचे सोन्या व चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. नमुद आरोपी याच्याकडे सखोल तपास करता, त्याने डोंबिवली पोलीस ठाणे, गुरजि नं. ७९५/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५, ३३१ (४) प्रमाणे गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. अशा प्रकारे सराईत आरोपी यास शिताफीने अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणून पुढील तपास डोंबिवली पोलिसांकडून सुरू आहे.
प्रस्तुत गुन्ह्यातील कारवाई मा. सुहास हेमाडे, सहायक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. गणेश जवादवाड, पोनि. पंकज भालेराव (गुन्हे) डोंबिवली पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा पोउनिरी. केशव हासगुळे, पोहवा. विशाल वाघ, सचिन भालेराव, प्रशांत सरनाईक, दत्तात्रय कुरणे, लोखंडे, पोना. कोळेकर, दिलीप कोती, पोशि. देविदास पोटे, शिवाजी राठोड, मंगेश वीर यांनी यशस्वीपणे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा