ठाणे : “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” ही योजना राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून ठाणे जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी, या योजनेच्या अंमलबजावणी मध्ये कोणतीही प्रशासकीय क्लिष्टता न आणता सुलभता आणावी, अशा प्रकारच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्याला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त भगिनींचा या योजनेमध्ये सहभाग नोंदवून ठाणे जिल्हा राज्यात अव्वल राहील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी अत्यंत कठोर परिश्रम घेत “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेची यशस्वी अंमलबजावणी करीत असल्याचे दिसून येत आहे.
“मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत दि. ६ ऑगस्ट २०२४ रोजी पर्यंत जिल्ह्यात ५ लाख ४७ हजार ८७० अर्जांच्या नोंदी झाल्या असून १००% अर्जांची तपासणी पूर्ण झाली आहे. यापैकी मान्यताप्राप्त अर्जांची संख्या ४ लाख ७६ हजार २५८ इतकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.
गेले काही दिवस ठाणे जिल्हा प्रशासनातील महिला व बालविकास विभागासह अन्य विविध विभाग, सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती मधील अधिकारी-कर्मचारी एकवटून या योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांवर अक्षरश: दिवसरात्र कार्यवाही करीत होते.
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सर्व महसूल यंत्रणांच्या वेळोवेळी बैठका घेवून या योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने होत असलेल्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला होता. त्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सर्व महानगरपालिका आयुक्त, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, प्रकल्प अधिकारी तसेच महिला बचतगट, एकात्मिक बालविकास अधिकारी, प्रभाग अधिकारी, कर संकलन अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका त्याचबरोबर इतर विभागांच्याही अधिकारी-कर्मचारी वर्गाची मोलाची साथ लाभली. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वांनी रात्रंदिवस परिश्रम घेवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
“मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्याची कामगिरी कौतुकास्पद
“मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत दि. ६ ऑगस्ट २०२४ रोजी पर्यंत जिल्ह्यात ५ लाख ४७ हजार ८७० अर्जांच्या नोंदी झाल्या असून १००% अर्जांची तपासणी पूर्ण झाली आहे. यापैकी मान्यताप्राप्त अर्जांची संख्या ४ लाख ७६ हजार २५८ इतकी असून ७० हजार ४५ अर्ज हे त्रुटीयुक्त आहेत. तर ८७५ अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात मुरबाड तालुक्याची उत्तम कामगिरी
जिल्ह्यात मुरबाड तालुक्याने उत्तम कामगिरी केली असून ३८ हजार ३०८ अर्जांपैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या ३७ हजार ८८६ आहे. तर त्रुटीयुक्त ३९० अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या २२ आहे. यानुसार जिल्ह्यात सर्वाधिक मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी मुरबाड तालुक्याची आहे. ही टक्केवारी ९८.९० टक्के आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय नोंदी झालेली अर्ज संख्या आणि मान्यताप्राप्त अर्जांची टक्केवारी:-
ठाणे तालुक्याने १ लाख ८७ हजार ९०० अर्जांच्या नोंदी केल्या. त्यापैकी १ लाख ८७ हजार ९०० अर्जांची तपासणी पूर्ण केली. यापैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या १ लाख ६३ हजार २२ आहे. तर त्रुटीयुक्त २५ हजार २२९ अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या २४५ आहे. यानुसार ठाणे तालुक्यातील मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी ८६.२३ टक्के आहे.
उल्हासनगर तालुक्याने ३६ हजार ४१७ अर्जांच्या नोंदी केल्या. त्यापैकी ३६ हजार ४१७ अर्जांची तपासणी पूर्ण केली. यापैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या २७ हजार ५९३ आहे. तर त्रुटीयुक्त ८ हजार ५९२ अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या १० आहे. यानुसार उल्हासनगर तालुक्यातील मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी ७५.७७ टक्के आहे.
कल्याण तालुक्याने १ लाख ६ हजार ६५७ अर्जांच्या नोंदी केल्या. त्यापैकी १ लाख ६ हजार ६५७ अर्जांची तपासणी पूर्ण केली. यापैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या ९० हजार ८९३ आहे. तर त्रुटीयुक्त १५ हजार ५९० अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या १५६ आहे. यानुसार कल्याण तालुक्यातील मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी ८५.२२ टक्के आहे.
भिवंडी तालुक्याने ८२ हजार ३१९ अर्जांच्या नोंदी केल्या. त्यापैकी ८२ हजार ३१९ अर्जांची तपासणी पूर्ण केली. यापैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या ७२ हजार ७५४ आहे. तर त्रुटीयुक्त ९ हजार ३४१ अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या २१८ आहे. यानुसार भिवंडी तालुक्यातील मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी ८३.३८ टक्के आहे.
अंबरनाथ तालुक्याने ५० हजार ८६६ अर्जांच्या नोंदी केल्या. त्यापैकी ५० हजार ८६६ अर्जांची तपासणी पूर्ण केली. यापैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या ४६ हजार ७९१ आहे. तर त्रुटीयुक्त ३ हजार ९४२ अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या ११९ आहे. यानुसार अंबरनाथ तालुक्यातील मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी ९१.९९ टक्के आहे.
शहापूर तालुक्याने ४५ हजार ४०३ अर्जांच्या नोंदी केल्या. त्यापैकी ४५ हजार ४०३ अर्जांची तपासणी पूर्ण केली. यापैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या ३८ हजार ३१९ आहे. तर त्रुटीयुक्त ६ हजार ९६१ अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या १०५ आहे. यानुसार उल्हासनगर तालुक्यातील मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी ८४.४० टक्के आहे.
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” ही योजना महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलांपर्यंत योजनेची माहिती पोहोचविणे, त्यांची नोंदणी करून घेणे व आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेणे, यासाठी सर्वच विभागांनी व्यवस्था केली होती. या योजनेसाठी लागणारे दाखले नागरिकांना मिळण्यासाठी तहसिलदारांनी योग्य त्या सुविधा निर्माण केल्या होत्या. प्रभाग अधिकारी, कर संकलन अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आदींनी एकत्रित कामे केली. शहरी भागात प्रत्येक प्रभाग कार्यालयात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या. या योजनेतील सहभागासाठी कोणत्याही भगिनीला अडचण येणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घेण्यात आली होती.
ठाणे जिल्ह्यात शहरी भागांबरोबरच आदिवासी, ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी भागातील महिलांपर्यंत ही योजना पोहोचवून त्यांना याचा लाभ मिळावा, यासाठी सर्वच विभागांनी काटेकोर नियोजन केले होते. पुढील महिन्याभरात आणखी काही महिला वंचित राहिल्या आहेत का, याची तपासणी करून उर्वरित महिला भगिनींची देखील नोंदणी करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा