डोंबिवली: आज रोजी गुन्हे शाखा घटक-३ घटकातील सहा. पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, दोन इसम चोरीचे मोबाईल व वाहनातुन चोरी केलेली बॅटरी विक्री करण्याकरिता येणार आहेत. सदर बातमीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा, घटक-०३ कल्याण कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कोळेगाव रोडच्या बाजुला कल्याण शिळ फाटा रोड येथे सापळा लावुन संशयित इसम १) अनुराग सुनिल मंडराई (वय: २० वर्षे) रा: संत रोहिदास बिल्डींग रूम नं. ७०८, वीर सावरकर रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, डोंबिवली (पूर्व) व २) इरफान बाबु शेख (वय: २२ वर्षे) रा. प्रमिता बिल्डींग रूम नं. १०२, स्मशानभुमी जवळ, गोलवली गाव, मानपाडा डोंबिवली पूर्व यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडे मिळून आलेल्या मोबाईल व बॅटरी बाबत दोघांकडे अधिक विश्वासात घेवून कसून विचारपुस करता त्यांनी माहिती दिली की, त्यांनी दोघांनी मिळून दि. ०७/०८/२०२४ रोजी रात्रीच्या सुमारास सोनारपाडा, डोंबिवली (पूर्व) येथील भंगार दुकानात पार्क केलेल्या ऍप्पे तीन चाकी टमटमची बॅटरी व सदर भंगार दुकानात झोपलेल्या कामगारांचे मोबाईल चोरी केले असुन ते मोबाईल व बॅटरी विक्री करण्याकरीता ते घेवुन जात असल्याचे सांगितले. सदर मोबाईल फोन व बॅटरी चोरी बाबत परिमंडळ - ३ कल्याण पोलीस ठाणे यांच्याकडे खात्री करता, मानपाडा पोलीस ठाणे गु.रजि नंबर ९७०/२०२४ बी. एन.एस २०२३ कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. नमुद दोन्ही आरोपी यांच्याकडुन एकुण ५०,१००/- रु. किमंतीचे ०५ मोबाईल व ०१ तीन चाकी वाहनाची बॅटरी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नमुद आरोपी यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी सापडलेल्या मुद्देमालासह मानपाडा पोलीस ठाणे डोंबिवली पूर्व येथे हजर करण्यात आले आहे.
सदर दोन्ही गुन्हेगार पोलीस रेकॉर्ड वरील अट्टल घरफोडी करणारे असून १) इरफान बाबू शेख वर मानपाडा पोलीस स्टेशन, डोंबिवली पोलीस स्टेशन आणि टिळक नगर पोलीस स्टेशन येथे एकूण घरफोडी, चोरीचे १२ गुन्हे दाखल आहेत, तसेच २) अनुराग सुनिल मंडराई याच्यावर वरील पोलीस स्टेशन प्रमाणे घरफोडी चोरीचे ५ गुन्हे दाखल आहेत. सदरचा पुढील तपास मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.
प्रस्तुत गुन्ह्याची यशस्वी कामगिरी मा. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व मा. शेखर बागडे, सहा पोलीस आयुक्त, (शोध - १) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सपोनि. संतोष उगलमुगले, सपोउपनि. दत्ताराम भोसले, पोहवा. विश्वास माने, पोना. दिपक महाजन, पोकाँ. गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे, उमेश जाधव, सतिश सोनावणे यांनी यशस्वीपणे केलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा