BREAKING NEWS
latest

दहीहंडी फोडताना ६३ गोविंदा जखमी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत   

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत दहीहंडीचा उत्सव जल्लोषात सुरू आहे. शहरात विविध ठिकाणी उंचच उंच दहीहंडी बांधण्यात आल्या. तर त्यांना फोडण्यासाठी दहीहंडी पथकांमध्ये चुरस रंगताना दिसणार आहे. यात पावसाने हजेरी लावल्याने गोविंदा पथकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आज सकाळ पासून दहीहंडी फोडताना सायंकाळी ७ वाजेपर्यंत ६३ गोविंदा जखमी झाले आहे .या गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या मध्ये ८ गोविंदाना रुग्णालयात दाखल केलं आहे. ३२ गोविंदांवर ओपीडीमध्ये उपचार सुरु आहेत तर २३ गोविंदांना उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जे.जे रुग्णालयामध्ये एका गोविंदाला दाखल करून त्याला उपचारांती सोडून देण्यात आले आहे. सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये ३ गोविंदापैकी एक गोविंदा दाखल, १ डिस्चार्ज, तर एकावर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. जी.टी हॉस्पिटलमध्ये एक गोविंदा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करून सोडून देण्यात आले आहे पोद्दार हॉस्पीटल मधील ६ ही गोविंदावर उपचार करून डिस्चार्ज करण्यात आला आहे. के.ई.एम रुग्णालयात ८ जखमी गोविंदाना दाखल करण्यात आलं होतं. एका गोविंदाला रुग्णालयात दाखल केलं असून ७ रुग्णांवर ओपीडी मध्येउपचार सुरू आहे. नायर हॉस्पीटलमध्ये ५ गोविंदावर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. सायन हॉस्पिटलमध्ये ७ गोविंदा वर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. राजावाडी रुग्णालयात ३ गोविंदाना दाखल करण्यात आले असून दोघे जण दाखल असून एकाला डिस्चार्ज दिला आहे. वीर सावरकर रुग्णालयात १ डिस्चार्ज, एमटी अग्रवाल हॉस्पीटल मध्ये १ डिस्चार्ज, कुर्ला भाभा रुग्णालय: २ पैकी १ दाखल, १ डिस्चार्ज, 
शताब्दी गोवंडी रुग्णालय: ६ डिस्चार्ज, वांद्रे भाभा रुग्णालय: ३ ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. ट्रॉमा केअर हॉस्पिटल: ४ डिस्चार्ज. सांताक्रूझ व्ही.एन देसाई हॉस्पिटल: ३ ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत.
एम.डब्यु देसाई हॉस्पिटल: १ डिस्चार्ज भाभा रुग्णालयात ७ पैकी १ दाखल, ६ ओपीडी मध्ये उपचार सुरू आहेत तर लीलावती रुग्णालयत १ गोविंदा दाखल आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत