डोंबिवली दि.३१: राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जीवनावर आधारित मोरया प्रकाशन प्रकाशित 'जे देखे रवि' या सन्मानग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात राजकीय समीक्षक तसेच ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. द्वितीय आवृत्तीत सुमारे शंभरहून अधिक लेखकांनी चव्हाण यांच्या कार्यशैलीत त्यांचा स्वभाव याबद्दल लिखाण केले आहे. त्याद्वारे रवींद्र चव्हाण यांच्यावर आधारित 'जे देखे रवि' या सन्मानग्रंथाचे प्रकाशन करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या शहराने मला भरपूर प्रेम दिलं या सांस्कृतिक संस्कारमय शहारामुळे मी आमदार झालोय, आता यापुढे राजकारणात वैचारिक समानता आणून या देशाला परम वैभव प्राप्त होण्यासाठी भाजपचे विचार आचार तळागाळापर्यंत पोहोचवून पक्ष मजबूत करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीन असे विचार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
कोणत्याही राजकीय पक्षाची पाळंमुळं ही त्या पक्ष कार्यकर्त्याच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असतात. याठिकाणी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासाठी उपस्थित आसलेल्या जनसमुदायावरून त्यांचे येथील कार्य हे चांगले सुरू आहे हे स्पष्ट होते. तसेच त्याआधी माजी उत्पादन शुल्क मंत्री जगन्नाथ पाटील यांचे कार्य चांगले होते. त्यांनी केलेल्या चांगल्या कार्यामुळे पक्षाला रवींद्र चव्हाण मिळाले. मला सगळ्यात कौतुकाचं वाटलं की त्या समारंभाचा शेवट झाला शिवाय एका गोविंदा दही हंडी पथक त्या लोकांनी पंचावन्न हजाराची गणेश मंदिर संस्थानाला देणगी दिली. माझ्या दृष्टीने महत्वाची गोष्ट अशी आहे की आज सगळीकडे मागितलं जात असताना देणारे कोणीतरी समोरून आले. रवींद्र चव्हाणांनी देणारे लोकं तयार केले असतील तर माझ्या मते त्यांनी मोठं काम केलं आहे. नाहीतर राजकीय नेते हे फक्त हात पसरवून मागायला शिकवतात. कोणीतरी एकजण असा नेता दिसला की ज्याने द्यायचं शिकवलं हे माझ्या दृष्टीने रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत केलेलं मोठं काम आहे असे राजकीय समीक्षक तसेच ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी बोलताना सांगितले.
या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, सुधीर जोगळेकर, मोरया प्रकाशनचे अध्यक्ष दिलीप महाजन, श्रीकांत कोजेवार, श्रीराम शिदये, माजी उत्पादन शुल्क मंत्री जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ उद्योजक शंकर भोईर, सुरेश देशपांडे, श्रीगणेश मंदिर संस्थान चे अध्यक्षा अलका मुतालिक, आमदार कुमार ऐलानी, 'ऊर्जा फाउंडेशन' च्या स्नेहल दीक्षित, माजी नगरसेवक राहुल दामले, शशिकांत कांबळे, भाजपा पश्चिम मंडल अध्यक्ष समीर चिटणीस, उपाध्यक्ष हरीश जावकर, ग्रामीण अध्यक्ष नंदू परब, नंदू जोशी, मनीषा राणे, वर्षा परमार, पूनम पाटील, 'कामा' संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी, राजू बेल्लूर आदी मान्यवर तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून भाऊ तोरसेकर यांचे राजकारण आणि समाजकारण या विषयावर त्यांचे विचार ऐकले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा