डोंबिवली दि.३०: गुन्हे शाखा युनिट -३ कल्याण चे सपोउनि. दत्ताराम भोसले यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत दि. ३०.०८.२०२४ रोजी दुपार दरम्यान बातमी मिळाली की, साल २०२२ मध्ये राहुल पाटील राहणार आडीवली यांच्यावर व त्यांच्या साथीदारावर अंबरनाथ येथील एमआयडीसी कार्यालयासमोरील सुदामा हॉटेल जवळ बैल गाडी शर्यतीच्या बाबतीत चर्चा करायची आहे असे प्लॅनिंग करून त्यांना जिवे ठार मारण्याचा कट रचून रिव्हॉल्वर व बंदूकानी अंधाधुंद फायरिंग करून खून करण्याचा पंढारीनाथ फडके व त्यांचे इतर साथीदारांनी प्रयत्न केला होता. त्या संदर्भात शिवाजी नगर पोलीस स्टेशन अंबरनाथ येथे गुन्हा दाखल आहे.
त्या गुन्ह्यातील काही आरोपी पकडले गेले असून काही आरोपी अद्यापर्यंत फरार आहेत. त्यापैकी फरार असलेले व मोका अंतर्गत कायद्याच्या कारवाईत पाहिजे असलेले महत्त्वाचे दोन इसम किरण गायकवाड राहणार देसले पाडा डोंबिवली पूर्व व दुसरा दिपेश जाधव राहणार वडवली मानपाडा डोंबिवली पूर्व हे कुठेतरी बाहेर जाण्यासाठी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान मानपाडा शीळ रोड येथे रुणवाल गार्डनच्या गेट समोर डोंबिवली पूर्व येथे भेटणार आहेत. त्यांची वर्णनानुसार खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट -३ कल्याण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना कळविताच त्यांनी तात्काळ विलंब न लावता ते स्वतः व सपोनि. संतोष उगलमुगले, सपोउनि. दत्ताराम भोसले, पोहवा. विलास कडू, विश्वास माने, उमेश जाधव, गुरुनाथ जरग, बोरकर (चालक) असे पथकासह बातमी मिळाल्या ठिकाणी सापळा लावला असता बातमीदाराने दिलेल्या वर्णनाप्रमाणे सदर दोन्ही इसम त्या ठिकाणी आले असता पोलीसांना पाहून कावरे बावरे होऊन ते पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना पळून जाण्याचा मोका न देता घेराव करून जागीच पकडले.
त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी आपले नाव १) किरण अशोक गायकवाड (वय: ३५ वर्षे) राहणार देसले पाडा भोपर रोड, डोंबिवली पूर्व, व २) दिपेश तुळशीराम जाधव (वय: ३० वर्षे) राहणार आडवली खुर्द, मानपाडा डोंबिवली पूर्व, असे सांगितले. त्यांना पोलीसांनी कार्यालयात आणून अधिक चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यांनी केल्याची कबूली दिली असून इसम किरण अशोक गायकवाड हा मानपाडा पो.स्टे. च्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून पोलीसांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ येथे संपर्क साधून चौकशी केली असता शिवाजी नगर स्टेशन गु.र.नं. ४०३/२०२२, भा.दं.वि. कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३४१, ५०६, ५०६(२)४२७, १२०(ब) सह शस्त्र अधिनियम कलम.३,२५, म.पो.का. कलम ३७(१)१३५ या गुन्ह्यात दोन्हीही आरोपी हे गेले दिड वर्षा पासून फरार (वॉन्टेड) आरोपी असून सदर वरील गुन्ह्यात निष्पन्न झाले. तसेच फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम १९३२ चे कलम ७ सह,महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३(१), ३(२), ३(४) (मोका) अंतर्गत कायद्या प्रमाणे कारवाईत पण वरील दोन्हीही आरोपी पाहिजे असून सदर वरील दाखल गुन्ह्याचा तपास मा.सहा.पोलीस आयुक्त सो.अंबरनाथ विभाग/अंबरनाथ यांचे कडे असून पुढील कारवाई करिता गुन्हे शाखा युनिट -३ कल्याण यांनी रिपोर्टसह आरोपीना ताब्यात देण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा