डोंबिवली : डोंबिवली सारख्या शैक्षणिक व सांस्कृतिक दुष्ट्या प्रगत असलेल्या शहरात चांगल्या डिग्री महाविद्यालयांची कमतरता भासत असून उत्तम शिक्षणासाठी चांगल्या कॉलेजेस ची संख्या पूरेशी नाही. स्थानिक विध्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मुंबई व इतरत्र जावे लागते. ही उणिव पूर्ण करण्याच्या उद्देशाने 'ट्रीनिटी एज्यूकेशन ट्रस्ट' संचालित 'हॉली ऍंजेल्स' विद्यालय आणि महाविद्यालय चे मा.अध्यक्ष डॉ. ओमेन डेव्हीड यांनी उच्च शिक्षणासाठी 'डॉ. डेव्हीड कालेज' ची स्थापना केली आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून 'होली ऍंजेल्स' शाळेचा रिझल्ट सातत्याने १००% लागत आहे अर्थातच गुणवत्तेविषयी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. शालेय व ज्युनियर कॉलेज स्तरावर जी गुणवत्ता आम्ही आजवर जोपासली तीच गुणवत्ता यापुढे आम्ही नव्याने सुरू केलेल्या डिग्री कॉलेज ची ही राखण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. २०२४-२५ पासून हे कॉलेज सुरू होत आहे व शिक्षणाच्या या सेवा हेतूने मा.अध्यक्ष डॉ. ओमेन डेव्हीड यांनी बघितलेले 'के.जी' टू 'पी.जी' चे स्वप्न एकाच छत्राखाली पूर्ण होत आहे.
त्याचप्रमाणे यावर्षी अर्थात २०२४-२५ साठी ज्युनिअर आणि सिनिअर के.जी ची प्रवेश प्रक्रिया आम्ही १५ ऑगस्ट २०२४ पासून सुरु करत असल्याची माहिती मा.अध्यक्ष डेव्हीड यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा