डोंबिवली दि.१३ : डोंबिवलीसारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नगरीत रोटरी जिल्ह्यातर्फे 'आयएमए' संघटनेच्या सहकार्याने रोटरी भवन येथे काल दि.१३.१०.२०२४ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत 'स्ट्रेस मॅनेजमेंट' या विषयावर "घर से ऑफिस तक, दिल से दिमाग तक" शिर्षकाखाली सेमिनार चे आयोजन करण्यात आले.
यावेळी या विषयावर चर्चा करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) संघटनेचे मानसोपचार तज्ञ केईएम इस्पितळाचे एमबीबीएस, एमडी डॉ. दुष्यंत भादलीकर आणि 'मनोबल' नेरोसायकॅट्रिक सेंटर चे डायरेक्टर डॉ. विजय चिंचोले हे 'स्ट्रेस मॅनेजमेंट' वरील "घर से ऑफिस तक, दिल से दिमाग तक" या विषयावर आपले मानसिक आरोग्य आणि ताण व्यवस्थापनाचे महत्व सांगण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सेमिनार चे प्रमुख वक्ते होते.
कार्यक्रमाला राष्ट्रगीताने सुरुवात करत रोटरीचे अध्यक्ष माधव सिंग यांनी प्रथम रोटरीचे जिल्हा गव्हर्नर दिनेश मेहता यांनी संधी देऊन या महत्त्वाच्या 'स्ट्रेस मॅनेजमेंट' या विषयावर डोंबिवलीत सेमिनार भरवण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल त्यांचे प्रथम आभार मानले व म्हणाले की 'रोटरी इंटरनॅशनल'ने मानसिक आरोग्याच्या जनजागृतीचे महत्त्व ओळखले आहे, विशेषतः आपल्या कामाच्या ठिकाणी. २०२४ मध्ये, रोटरी अधिकाधिक मानसिक कल्याण आणि कामाच्या ठिकाणी ताण व्यवस्थापनाच्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित करीत आहे. यावर्षीच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या (१० ऑक्टोबर) थीमचे शीर्षक आहे "कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य".
ही थीम महत्त्वाची आहे कारण ती कामाच्या ठिकाणी वाढत्या ताण, बर्नआउट आणि इतर मानसिक आरोग्य समस्या यावर प्रकाश टाकते. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स आणि जपान यांसारख्या देशांनी आधीच कामाच्या ठिकाणी ताण कमी करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाचे धोरणात्मक पाऊल उचलले आहे. रोटरी इंटरनॅशनल देखील "ताण व्यवस्थापन, काम, जीवन आणि रोटरी सेवा यामधील संतुलन साधा" अशा कार्यशाळांचे आयोजन करत आहे, ज्यामुळे रोटेरियन ताण व्यवस्थापन करतात आणि बर्नआउट टाळू शकतात.
जिल्हास्तरीय पातळीवर, जिल्हा गव्हर्नर दिनेश मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी दोन प्रमुख मानसिक आरोग्य आणि ताण व्यवस्थापन विषयक सेमिनारचे आयोजन करीत आहेत. हे सेमिनार आज ठाणे आणि डोंबिवलीत होत आहेत. हे सेमिनार तणावाच्या मूळ कारणांची समज आणि त्यावर प्रभावी उपाय शिकण्याचे मार्गदर्शन करतात.
स्थानिक पातळीवर, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट मानसिक आरोग्य आणि ताण व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करून महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. पुढील चार ते पाच महिन्यांत, आम्ही विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी, कामकाजी व्यावसायिकांसाठी आणि गृहिणींसाठी दोन मोठे सेमिनार आयोजित करणार आहोत असेही अध्यक्ष माधव सिंग म्हणाले.
या सर्व प्रयत्नांमुळे, रोटरी इंटरनॅशनल, आमचा जिल्हा, आणि आमच्या क्लबनी मानसिक आरोग्याच्या सुधारणेसाठी घेतलेल्या पुढाकाराचे महत्त्व दिसून येते. मी सर्वांना या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याचे आवाहन करतो. एकत्र येऊन, आपण आपले, आपल्या कुटुंबाचे आणि आपल्या समाजाचे आरोग्यदायी भविष्य निर्माण करू शकतो.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डी.ए.एफ.एस.सी टीआरएफ जिल्हा चेयरमन चंद्रहास शेट्टी, रोटरी अध्यक्ष माधव सिंग, आयएमए अध्यक्ष डॉ. शरद गुरव, सेक्रेटरी चंद्रापाणी शुक्ला, प्रमुख वक्ते मानसोपचारतज्ञ डॉ. विजय चिंचोले, डॉ. दुष्यंत भादलीकर, हेमंत मुंडके तसेच रोटोरियन लीना लोकरस, पुष्पा वैद्य, आरती धुत, गायत्री श्रीनिवासन, अनुज यादव, रिजेन्सी अनंतम रोटरी चे भगवान राघव, रोटोरियन डॉ. राजेश विनायक कदम, निलेश नेमाडे, जितेंद्र नेमाडे, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पूर्व, पश्चिम, हेरिटेज, रिजेन्सी अनंतम, सनसिटी, अपटाऊन, सौदामिनी, मिडटाऊन, विनर्स, डाऊनटाऊन, सिटी, डायमंड, इंडस्ट्रियल एरिया तसेच न्यू डोंबिवली रोटरी चे पदाधिकारी या सेमिनार ला उपस्थित होते.
यावेळी डॉ. विजय चिंचोले यांनी घरी व कामाच्या ठिकाणी आणि आपल्या आरोग्यावर तणाव कश्या प्रकारे असू शकतात व त्यावर तुम्ही कश्या प्रकारे मात करू शकता यावर उत्तम मार्गदर्शन केले. तर डॉ. दुष्यंत भादलीकर यांनी स्वतः प्रात्यक्षिक करत उपस्थितांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत तुमचा ताण हा तुम्हीच दूर करू शकता हे त्यांच्या मार्गदर्शनातून उपस्थितांना पटवून दिले आणि चला आपण प्रथम मानसिक आरोग्याला प्राधान्य देऊया असे सांगत सर्वांना धन्यवाद दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा