डोंबिवली: रविवारी भाजप पक्षाकडून डोंबिवली विधानसभा मतदारसंघात सलग चौथ्यांदा उमेदवारी मिळवून रविंद्र चव्हाण यांनी सर्वप्रथम ग्रामदैवत श्री गणेशाला वंदन करून आशीर्वाद घेतले. त्यानंतर सोमवारी महादेवाचे दर्शन घेऊन सिंधुदुर्गात आंगणेवाडीमध्ये जाऊन भराडी आईचे दर्शन घेऊन प्रचार दौऱ्याचा शुभारंभ केला.
मंत्री चव्हाण सिंधुदुर्गमध्ये येणार असल्याचे समजताच सोमवारी सकाळपासूनच तेथील भाजपचे पक्षाने दिलेले उमेदवार, इच्छुक उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. "जय श्रीराम, वंदे मातरम, भारत माता की जय" अशा घोषणा देऊन भराडी आईचा जयघोष करत आईच्या मंदिरात काही वेळ बसून महायुतीला भरघोस यश मिळावे असे साकडे घातले तसेच सिंधुदुर्ग मध्ये महायुतीचे मेळावे घेतले.
प्रचार दौऱ्याच्या सुरुवातीलाच मंत्री चव्हाण यांनी डोंबिवली मतदार संघात लोकांची सेवा करण्यासाठी आईने यश द्यावे, बळ द्यावे आणि सेवा करून घ्यावी असे म्हटले. त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये गाठीभेटी करून लगेचच मंत्री चव्हाण हे पुन्हा डोंबिवली येऊन मतदारसंघात मान्यवरांच्या भेटीगाठी करणार असल्याचे सांगण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा