डोंबिवली दि.२२ : डोंबिवली जिमखाना येथे झालेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेत यापूर्वी झालेल्या २००९, २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिल्यास दरवेळेस रविंद्र चव्हाण यांच्या मतांमध्ये वाढ झाली असून यंदाच्या निवडणुकीत ते विक्रमी मताधिक्क्याने विजयी होतील असा ठाम विश्वास महायुतीच्या डोंबिवलीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत झालेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या पत्रकार परिषदेत हा विश्वास व्यक्त करण्यात आला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलली. त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारमुळे भाजप-शिवसेना युती सरकारने सुरू केलेली अनेक विकासकामे रखडल्याचा आरोपही या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला. मात्र अडीच वर्षांपूर्वी राज्यात स्थापन झालेल्या भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारने पुन्हा एकदा इथल्या विकासकामांना गती दिली. आणि परिणामस्वरूप गेल्या काही महिन्यांमध्ये डोंबिवली मध्ये अनेक महत्त्वाची विकासकामे वेगाने सुरू झाली आहेत. ज्यामध्ये डोंबिवलीतील सर्व डांबरी रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचे काम सुरू असून येत्या काही महिन्यात डोंबिवलीकरांना सुसज्ज आणि चांगले रस्ते मिळतील असा विश्वास यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पत्रकार परिषदेसाठी व्यासपीठावर यावेळी भाजपचे शशिकांत कांबळे, राहुल दामले, नंदू परब, मंदार हळबे, समीर चिटणीस, मुकुंद (विशु) पेडणेकर, शिवसेनेचे राजेश कदम, राजेश मोरे, संतोष चव्हाण, संजय पावशे, विवेक खामकर, बंडू पाटील, दत्ता मळेकर, सागर जेधे, बाळा पवार, मितेश पेणकर, राष्ट्रवादीचे सुरेश जोशी, ऍड. ब्रम्हा माळी यांच्यासह डोंबिवलीतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा