डोंबिवली: कल्याण ग्रामीण मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कट्टर शिवसैनिक, भूमिपुत्र माजी आमदार सुभाष भोईर यांना 'महाविकास आघाडी' तर्फे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण मधील अधिकृत उमेदवार २०१४ चे माजी आमदार सुभाष भोईर यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात काँग्रेस चे संतोष केणे, राष्ट्रवादी चे वंडारशेट पाटील व शिवसेनेच्या वैशाली दरेकर यांच्या उपस्थित दाखल केला आहे.
सुभाष भोईर हे ६ वेळेस महापालिका मधून तर दुसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवीत आहे. कल्याण ग्रामीण मध्ये रस्त्यांच्या समस्या, पाणी समस्या, मुलांसाठी खेळाची मैदाने, बगीचे यासारख्या मोठ्या लोकोपयोगी समस्याचे निराकरण करणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे समोर कोण उभे आहे याचा जास्त विचार न करता सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्याकडे सोबत असंलेल्या घटक पक्षांना सोबत घेऊन आराखडा तयार असल्याचे आणि ही महाविकास आघाडी भक्कम असल्यामुळे इंजिन चा धूर निघतचं नाहीये त्यामुळे ही मशाल जी आहे ती धगधग करून विधानसभेत जाणार असल्याचे सुभाष भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांना संगितले.
कल्याण ग्रामीण मधील सध्या मनसेचे एकमेव विद्यमान आमदार प्रमोद (राजू दादा) पाटील यांच्या समोर यंदा मविआ चे तगडे आव्हान ठाकले असल्याचे बोलले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा