BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेतर्फे आदिवासी बंधू-भगिनींसोबत 'एक दिवाळी अशीही' असा भव्यदिव्य उपक्रम..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: दिवाळी हा सण दिव्यांचा, आनंदाचा, देवाण घेवाणीचा. नेहमीच आपण दिवाळी सण आपल्या कुटुंबासोबत साजरा करत असतो, पण सामाजिक बांधिलकी, कर्तव्य आणि भावना या गोष्टीला प्राधान्य देत संस्थेचे संस्थापक माननीय डॉ.राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ.प्रेरणा कोल्हे, तसेच खजिनदार जाह्नवी कोल्हे यांनी, दिवाळी पूर्व शहापूर आदिवासी पाडा येथे जाऊन सर्व आदिवासी बंधू भगिनी सोबत दिवाळी साजरी केली. यामधे राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) असंख्य विद्यार्थ्यांनी देखील या भव्यदिव्य उपक्रमात आपला सहभाग दर्शवला होता. 
                     
"देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे".. कवी विंदा करंदीकर यांनी लिहिलेल्या पंक्ती प्रमाणे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांचे हात सतत दुसऱ्यांना काही ना काहीतरी देण्यासाठी सदैव पुढे आणि आतुरलेले असतात. दरवर्षी प्रमाणेच या वर्षी देखील डॉ. राजकुमार कोल्हे आणि डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आदिवासी गरजू व्यक्तींना दिवाळीसाठी किराणा सामान, पणत्या, महिलांना साड्या, गृहापोयोगी वस्तू, चादरी, बेडशीट तर मुलांना शैक्षणिक साहित्य, खाऊ, दिवाळीचा फराळ, अशा अत्यावश्यक व गरजेच्या वस्तू, भांडी देऊन त्यांना दिवाळीचा आनंद दिला.
                                              
'जन गण मन' इंग्लिश सेकंडरी शाळा, तसेच विद्यामंदिर, पदवी महाविद्यालय मधील सर्व विद्यार्थ्यांनी देखील घरातून जुन्या परंतु नीट नेटक्या वस्तू आणून, व तिथं पर्यंत पोहचून आपलंखारीचा वाटा दिला. 'जे एम एफ' संस्थे तर्फे सर्व आदिवासी बंधू-भगिनिंसाठी, मुलांसाठी यथेच्छ भोजनाची व्यवस्था करण्यात आली .
                                               
आज मला पराकोटीचे समाधान मिळत आहे, तो म्हणजे तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघुन. देणारा परमेश्वर आहे आणि माझ्या हाताने 'तो'  दान करवतो म्हणून मी मात्र एक निमित्त आहे, असे उद्गार काढून संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व आदिवासी मुलांबरोबर फराळ करून व फटाके वाजवून दिवाळी साजरी केली. 

ज्या प्रमाणे 'जे एम एफ' मधील सर्व कर्मचारी, शिक्षक हे आमच्याच कुटंबाचे सदस्य आहेत, त्याच प्रमाणे आपण देखील आमच्याच कुटुंबाचा एक भाग आहात, असे भावना पूर्ण उद्गार काढून डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी पुढच्याही वर्षीची दिवाळी आपण अशीच भव्यदिव्य करू असे आश्वासन आणि शुभेच्छा दिल्या. 
दरवर्षी प्रमाणेच वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी शिक्षक, यांनी विशेष सात दिवसांच्या शिबिराचे आयोजन ठाणे जिल्ह्यामधील शहापूर तालुक्यात दसई येथे केले. शिबिराच्या दिनचर्ये मध्ये रोज सकाळी पहाटे लवकर उठून व्यायाम, प्राणायाम, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अशा प्रकारच्या अनेक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. दिवस भराच्या कार्याचे चर्चासत्र रात्री भरवणे. महाविद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. आर.एन नाडर, तसेच व्यवस्थापक श्री. विठ्ठल कोल्हे, सौ. कविता कोल्हे, घनश्याम शिरसाठ, अल्पेश खोब्रागडे, योगेश कांबळे, लक्ष्मीकांतजी पौडवाल, धनश्री वर्मा, अंजली साने, अवधूत देसाई, श्री. सुनील तांदूळकर यांनी उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांची काळजी घेऊन त्यांना योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले. शिबिराचे आयोजक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा यांनी देखील शिबिराला भेट देऊन विद्यार्थ्यांबरोबर खास एक दिवस शिबिरात घालवला.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत