BREAKING NEWS
latest

सुलभा गणपत गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज विनोद तावडे आणि राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : सुलभ गणपत गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज महापालिकेच्या 'ड' प्रभाग कार्यालयात केंद्रातील भाजप वरिष्ठ नेते विनोद तावडे, राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी उत्पादनशुल्क मंत्री तसेच ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, उल्हासनगर चे आमदार कुमार ऐलानी यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार असल्याने परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. प्रवाश्यांना वाहतूकची कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस अथक परिश्रम घेत होते.
आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रती येथील जनतेचा असलेला विश्वास आणि सुलभा गायकवाड यांनी वाढवलेला जनसंपर्क या मुळे कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड या प्रचंड मताधिक्क्याने विजयी होतीत असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
राज्यातील महायुतीच्या माध्यमातून १४२ - कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. सुलभा गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करीत गुरुवारी प्रभाग 'ड' कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या पूर्वी तिसाई हाऊस ते प्रभाग 'ड' कार्यालय या दरम्यान युतीच्या अनेक गणमान्य नेत्यांच्या उपस्थितीत भव्य अशी शक्तीप्रदर्शन रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत मंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार कपिल पाटील, भाजपा नेते विनोद तावडे, आमदार कुमार आयलाणी, दलीत मित्र अण्णा रोकडे, कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या सह सुमारे ८ हजाराहून अधिक महायुतीचे कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते .
मोठ्या उत्साही वातावरणात आणि ढोल ताशांचा गजरात, डिजे, चित्र रथ, त्याच बरोबर विविध जाती धर्मातील ताल वाद्यांच्या गजरात निघालेल्या या रॅलीत आमदार गणपत गायकवाड यांचे खंदे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
या समयी प्रसार माध्यमांशी बोलतांना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की गेली अनेक दशके या मतदार संघात सेना-भाजपाची युती आहे, आमदार गणपत गायकवाड यांचा प्रचंड असा जनसंपर्क आहे, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून सुलभाताई गायकवाड ही निवडणूक लढत असल्याने त्यांचा विजय नक्की आहे या रॅली दरम्यान कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत