संदिप कसालकर
जोगेश्वरी पूर्व के/पु विभागातील अनेक वसाहतींमध्ये पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. न्यू शामनगर, कोकण नगर, सर्वोदय नगर, मेघवाडी, संजय नगर, गोणी नगर, पी.एम.जी.पी. वसाहत, म्हाडा कॉलनी, शिव टेकडी, आनंद नगर, अग्रवाल नगर, प्रताप नगर, स्मशान टेकडी, चाचा नगर, फ्रान्सिस वाडी, मकरानी पाडा आणि सुभाष नगर या भागांतील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे.
पाण्याच्या टंचाईमुळे नागरिक अत्यंत त्रस्त झाले असून, संबंधित अधिकारी आणि विभागाच्या वरिष्ठांना वारंवार सांगूनही समस्येवर उपाययोजना नाही. माजी नगरसेवक अनंत (बाळा) नर यांनी स्वतः माळवदे HE आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी रोज संपर्क साधून देखील परिस्थिती जैसे थे आहे.
“काय करावं आयुक्त साहेब, शेवटचा पर्याय म्हणून आपणांस कळवित आहे,” अशी भावना अनंत (बाळा) नर यांनी व्यक्त केली आहे.
सध्या परिस्थिती जैसे थे राहिल्यास संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करणार का? प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा