डोंबिवली: कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रमोद (राजू) रतन पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज १४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत रमेश रतन पाटील, १४८- ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अविनाश जाधव, प्रकाश भोईर, डोंबिवली मनसे शहरप्रमुख राहुल कामत, माजी शहराध्यक्ष मनोज घरत, अरुण जांभळे उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज भरून आल्यावर सलग दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली यावर प्रतिक्रिया देताना राजू पाटील म्हणाले की आजच्याच दिवशी २०१९ ला निकाल लागला होता आणि लोकांनी मला निवडून विजयी करून दिले होते तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि लकी पण आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही सगळ्यांनी येऊन येथे फॉर्म भरला आणि दुधात साखर पडली कारण पक्षाध्यक्ष माननीय राज साहेब पहिल्यांदा फॉर्म भरण्यासाठी स्वतः इथे आले आहेत, त्यामुळे आनंदी वातावरण असून आम्ही खुशीत आहोत कारण ज्याच्या पाठीमागे राज साहेबांचा हात असतो त्यांना आत्मविश्वास हा असतोच आणि त्या आत्मविश्वासाने आज उमेदवारी अर्ज दाखल केला असे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
यावेळी ठाणे लोकसभा उमेदवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः राज साहेब सोबत आले. मागील पाच वर्ष आम्ही जे काही काम केलं असेल, कोविड च्या काळातील काम असेल, विविध विषयांची आंदोलनं असतील, पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न ही जी काही मागील पाच वर्षात केलेल्या कामांच्या आधारे आम्ही जनतेसमोर जाणार आहोत आणि मतं मागणार आहोत. आणि पुढील पाच वर्षे आम्हाला आमच्या शहरांसाठी उत्तम काम करायचे आहे त्याकरिता लोकांची साथ मागणार आहोत आणि लोकं आमच्या सीबत उभी राहतील अशी आम्हाला खात्री आहे कारण मागच्या काळात ज्या काही आघाड्या आणि युत्या घडल्या त्याबाबत लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आणि तिसरा पर्याय म्हणून लोकं सन्मानाने राज साहेबांकडे पाहतात म्हणून पूर्ण खात्रीने येणाऱ्या निवडणूकिला आम्ही सामोरे जाऊ आणि विजय मिळवू.
ठाण्यात महायुतीकडून संजय केळकरांना उमेदवारी दिल्याने प्रचंड नाराजी असल्याने त्याचा फायदा कसा करून घेणार ? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना अविनाश जाधव म्हणाले की यंदा माझ्या विरोधात संजय केळकर (भाजप) आणि राजन विचारे (उबाठा) हे दोन उमेदवार आहेत जे मागच्या निवडणूकीला दोघेही एकत्र होते आणि एकाच गाडीवरून माझ्या विरोधात प्रचार करत होते ते आता दोघे एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. पाहिलं त्या दोघांना एकमेकांच्या विरोधात निपटावं आणि मग माझ्याकडे यावं. मग मी ठरवेन कोणाविरोधात लढावं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा