BREAKING NEWS
latest

महाविकास आघाडीतील उबाठा पक्षाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी भरला आपला उमेदवारी अर्ज..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी सोमवारी रथावर आरूढ होत काढलेल्या रॅलीच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचे पिताश्री तथा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, माजी आमदार आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे शिवसेना (उबाठा) उमेदवार सुभाष भोईर, वैशाली दरेकर, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, माजी नगरसेवक नंदू म्हात्रे, उबाठाचे तात्यासाहेब माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदू मालवणकर, लालबावटा आणि कम्युनिस्ट पक्षाचे तालुकाप्रमुख कॉम्रेड काळू कोमास्कर, दीपेश म्हात्रे यांच्या मातोश्री तथा माजी नगरसेविका रत्नाताई मात्रे आणि त्यांचे कुटुंब यावेळी उपस्थित होते.
दीपेश म्हात्रे यांनी गांवदेवी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर आपल्या जनसंपर्क कार्यालयापासून रॅलीची सुरुवात झाली. जेष्ठ महिला-पुरुषांसह हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रॅलीत सहभागी झाले होते. रॅली सम्राटचौक मार्गे दीनदयाळ रोडवरून हॉटेल द्वारका चौक मार्गे कोपरब्रिज पार करून डोंबिवली पूर्वेत आली. पूर्वेतून केळकर रोड मार्गे इंदिरा चौकातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर पुढे मानपाडा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांना नतमस्तक होत त्यानंतर फडके रोड मार्गे गावकीच्या श्री गणेश मंदिरात श्री गणेशाचे दर्शन घेऊन डोंबिवली विधानसभा क्षेत्र निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांच्याकडे आपल्या आमदारकीच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले की, डोंबिवलीचा विकास हाच एक मात्र माझा उद्देश आहे. शहराचा शाश्वत विकास हाच विषय निवडणूकच्या माध्यमातून आहे. रॅलीत "शिवसेना झिंदाबाद, उद्धवसाहेब आगे बढो हम आपके साथ है, महाआघाडी झिंदाबाद" अशा घोषणा देत शिवसैनिकांसह महाआघाडी घटक पक्षातील लोकांनी डोंबिवलीत मोठे शक्ती प्रदर्शन केले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत