डोंबिवली: कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सुभाष भोईर यांच्या प्रचारासाठी डोंबिवलीमध्ये परिवर्तन प्रचार रॅली काढण्यात आली. डोंबिवली मानपाडा येथील आयोध्या नगरी येथून या प्रचार फेरीला सुरवात होऊन महावीर नगर, गांधीनगर सुभाष डेअरी, राही पार्क, महावीर हॉस्पिटल, पी.एन.टी कॉलनी, गांधीनगर चौक, गणेश नगर, आयकॉन हॉस्पिटल, आनंदनगर, पांडुरंग वाडी, मॉडेल गल्ली ते धर्मवीर आनंद दिघे सार्वजनिक वाचनालय आणि ज्येष्ठ नागरिक कट्टापर्यंत ही प्रचार फेरी काढण्यात आली.
या प्रचार फेरीमध्ये ज्येष्ठ नागरिक, दुकानदार, फेरीवाले, इमारतीमधील नागरिक यांच्या गाठीभेटी घेवून महाविकास आघाडीची भूमिका समजावून सांगत महायुतीने केलेला विश्वासघात आणि झालेली फसवणूक दूर करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांना निवडून देण्याचे तसेच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे आवाहन लोकांना करण्यात आले. या प्रचार रॅलीमध्ये संपर्क संघटिका मृणाल यज्ञेश्वर, जिल्हा संघटिका वैशाली दरेकर, कल्याण ग्रामीण संपर्क प्रमुख अरविंद बिरमोळे, शहर प्रमुख अभिजित अशोक सावंत, युवा सेना जिल्हा अधिकारी प्रतिक पाटील, उपशहर प्रमुख वायकोळे, शहर संघटिका मंगला सुळे, उप शहर संघटिका स्मिता पाटील, शुभदा देसाई, उप विभागप्रमुख जगदीश जुलूम, विभाग प्रमुख मंगेश मोरे, उप विभाग प्रमुख रेवणकर, शाखाप्रमुख मंगेश सरमळकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा