मुंबई : कोरोना काळात ज्या राजकीय नेत्यांनी आणि त्याच्या पक्षातील प्रमुखांनी कोरोना काळात जनतेच्या मदतीला धावले नाहीत. त्यावेळी सामान्य जनतेचे हाल झाले होते. मात्र कोणीही त्यावेळी मदतीला पुढे आले नाही. याचा जाब विधानसभा उमेदवारांना मतदार विचारीत आहेत. मतदानाच्या दिवशी मतदानातुन हा रोष आता बाहेर पडणार आहे.
कोरोना काळात काहीजण मुंबई येथुन जनतेचे हाल पाहत होते. गंगाखेड विधानसभा मतदार संघातील जनतेच्या अडचणीला धावून आले नाही. स्थानिक पातळीवर अनेक नेते घरात बसुन जनतेच्या बिकट परीस्थितीचे चित्र पाहत बसले होते. त्यांच्या मदतीला धावून आले नाही. मतदार भावी उमेदवाराच्या, लोकप्रतिनिधीच्या दारात जाऊन अडचणी सोडवण्यासाठी विनंती करत होते. या विनंतीला पायदळी तुडवत जनतेला दारातुन हाकलुन लावीत होते. मतदानाला पैसा दिला, मी फुकट मतदान घेतले नाही असे म्हणून मतदारावर रागावण्याचे काम अनेकांनी केले. तेच उमेदवार मतदाराच्या दारापुढे जाऊन आता मतदान करण्याची विनंती करत आहेत.
मतदार कोरोना काळात काय केले असा प्रश्न विचारून त्या उमेदवाराला झिडकारत असल्याचे चित्र गंगाखेड विधानसभा मतदार संघात पाहायला मिळत आहे. कोरोना काळात उपचारा अभावी अनेकांचा मृत्यू झाल्याने त्यांची घरे उध्वस्त झाली. अशा लोकांना राजकीय नेत्यांनी त्या काळात पायदळी तुडवत मदत केली नाही. मुंबई येथुन कोरोना काळात आणी दुष्काळात जनतेच्या हालअपेष्टा काहीजण पाहत बसले होते. काहीतरी मदत मिळेल म्हणून नेत्यांना मोबाईलवर फोन करत होते. मोबाईल केलेल्या व्यक्तीला शिव्या घालण्याची मजल काही उमेदवारांनी केली होती. याचा वचपा काढण्यासाठी मतदार मतदानातुन आपला रोष व्यक्त करणार असल्याचे येथे दिसुन येत आहे. ग्रामीण भागातील मतदार त्या उमेदवाराला फटकारत असल्याचे समोर येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा