डोंबिवली : सर्वधर्म समभाव ही भावना उपजतच आपल्या भारतीयांमध्ये आहे. याच अनुषंगाने 'जे एम एफ' संस्था अंतर्गत जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर मधे गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात आणि विद्यार्थी शिक्षक यांच्या मोठ्या संख्येने साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी 'लंगर' या कार्यक्रमाचे आयोजन करून आपली उपस्थिती दाखवली. शीख धर्मियांचे गुरू व संस्थापक वाहे गुरु, गुरुनानक जी यांची आज ५५५ वी जयंती. संस्थापक व सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी गुरुनानक जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रार्थना केली.
लंगर म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन जमिनीवर बसून एकत्रितपणे भोजन करणे. एकमेकांच्या पदार्थांची देवाण घेवाण करून तृप्त मनाने त्या भोजनाचा आस्वाद घेणे असून गरजू व भुकेलेल्या व्यक्तींना अन्नदान करणे हे महत्वाचे कार्य आहे. सर्व विद्यार्थी शिक्षकांनी घरातून पुरी भाजीचे डबे आणून प्रार्थना झाल्यावर एकत्रितपणे बसून भोजनास सुरुवात केली. 'अन्नदान हे श्रेष्ठ दान' आहे म्हणून सर्व मुलांनी स्वतः खाण्यापूर्वी आपल्या डब्यातील अन्नाचा काही भाग हा गोरगरिबांना वाटण्यासाठी काढून ठेवला.
'अन्न हे पूर्णब्रह्म' आहे असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगून अन्न वाया जाऊ न देता ते कुणाच्या मुखात गेले तर आपल्याला त्या आत्म्याचे आशीर्वादच मिळतात असे वक्तव्य केले व स्वतः सर्व मुलांना फळे वाटून लंगर चा आनंद घेतला. गुरुनानक यांची गोष्ट सांगून एका प्रकाश पर्वाचा उदय कसा झाला त्याचे कथन केले. भोजनापूर्वी सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी श्लोक वदन केला.
कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा, महादेवाने त्रिपुरारी राक्षसाचा आजच्या दिवशी वध केला म्हणून आपल्या हिंदू धर्मात त्रिपुरारी पौर्णिमेला खूप महत्व आहे असे संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगून संपूर्ण भारतभर मंदिरामध्ये संध्याकाळी शुद्ध तुपाचे दिवे प्रज्वलित करून दीपोत्सवाने दाही दिशा उजळून निघतात असे सांगितले. सर्व मुलांनी डोक्यावर रुमाल बांधून व मुलींनी ओढणी घेऊन प्रार्थना करून गुरुनानक जयंती सकाळ आणि दुपार अशा दोन्ही सत्रात धार्मिकतेने आणि उत्साहाने साजरी केली गेली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा