BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये भारत विकास परिषदेकडून तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत 'एनिमिया मुक्त' तपासणी शिबिर आयोजन व संविधान दिवस साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - सामाजिक कार्य आणि बांधिलकीच्या भावनेतूनच 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. मुलींच्या व महिलांच्या शरीरात हिमोग्लोबिन ची कमतरता  
(एनिमिया) होण्याचे प्रकार सध्या अस्तित्वात दिसून येत आहे. मुलींचे स्वास्थ नीट असावे असा विचार करून संस्थेच्या संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे व संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी भारत विकास परिषदेच्या अंतर्गत तज्ञ शल्य चिकित्सकांचे शिबिर संस्थेच्या मधुबन वातानुकुलीत दालनांमध्ये आयोजित केले. 'जे एम एफ' संस्था अंतर्गत जन गण मन इंग्लिश शाळा आणि विद्यामंदिर तसेच वंदे मातरम् महाविद्यालय मधील वय वर्षे दहा पासून पुढे सर्वच विद्यार्थीनी, महिला, पालक, शिक्षिका यांच्यासाठी रक्तक्षय तपासणी करण्यात आली.
 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोकण प्रांताचे अध्यक्ष सीमांत जी प्रधान, अध्यक्ष ऍड.वृंदा कुलकर्णी, डॉ.सचिन पेणकर, डोंबिवली शाखेचे संस्थापक अध्यक्ष श्री.माधव जोशी यांची उपस्थिती प्रार्थनीय होती तर कारगिल युध्दात शहीद झालेले कॅप्टन विनय कुमार सचान यांचे मातोश्री व पिताश्री आवर्जून उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. भारत माता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आज संविधान दिवस म्हणून उपस्थित सर्व  समुदाय व विद्यार्थी यांच्याकडून भारताचे संविधान उद्देशिका प्रतिज्ञा घेतली.त्याच बरोबर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज १६ वर्ष पूर्ण झाली. त्या सर्व शहिदांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
 आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलताना डॉ. राजकुमार कोल्हे म्हणाले की, सर्व विद्यार्थीनी आणि महिलांनी मनाबरोबरच शरीराने ही तंदुरुस्त असावे, त्यासाठी योग्य सात्विक आहार सेवन करावा. स्त्री हे शक्तीचे रूप आहे, एकाच वेळी अनेक कामे करताना आपल्या शरीरातील होणाऱ्या बदलांकडे ही लक्ष द्यावे व  काळजी घ्यावी असे सांगितले. दहा वर्षा पुढील सर्व विद्यार्थिनींनी पोषक आहार सेवन करून व्यायाम करणे गरजेचे आहे तरच रक्तातील लाल पेशी वाढतील असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी विद्यार्थिनींना सांगितले तर रोजची तारेवरची कसरत करणाऱ्या माझ्या सख्यांना मी एवढच सांगू इच्छिते की कामातून वेळ काढून स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या व गोळ्या औषधंपेक्षा प्रोटीनयुक्त पोषक आहार घेऊन आपल्या रक्तातील लाल पेशीचे प्रमाण वाढवा असा सल्ला दिला.
तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने सर्व विद्यार्थिनी महिलांची रक्तक्षय तपासणी करून गरजेनुसार औषधेही दिली त्याच बरोबर सेवन करण्यासाठी प्रोटीन व लोह युक्त आवश्यक असे भाजके फुटाणे व गुळाचे पाकीट देखील सर्वांना दिले. यामधे १२०० च्या वर विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी सहभाग घेतला.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत