डोंबिवली दि.०४: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्रातील पहिली विधानसभा निवडणूक प्रचार सभा कल्याण - १४४ ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आज रोजी सायंकाळी ४ वाजता श्री महावैष्णव मारुती मंदिर,पी एन्ड टी कॉलनी चौक, डोंबिवली (पूर्व) येथे पार पडणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जाहीर सभेत काय परखड बोलणार? कोणावर टीका करणार? महाराष्ट्रातील राजकारणावर काय बोलतील? याकडे सर्व राजकीय पक्षांचे नव्हे तर नागरिकांचेही लक्ष असते. राज ठाकरे यांची जाहीर सभा म्हणजे प्रचंड गर्दी होणार हे पोलीस यंत्रणेला माहित असल्याने सभेच्या एक दिवस अगोदर सभेच्या ठिकाणची वाहतूक व्यवस्था वळविने, कडक पोलीस बंदोबस्त ठेवणे हे काम सुरु असते. सभेत मनसेचे कल्याण ग्रामीण उमेदवार प्रमोद (राजू) पाटील, कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहरअध्यक्ष राहुल कामत, शहर अध्यक्षा मंदा पाटील, हर्षद पाटील, मनोज घरत, अरुण जांभळे, योगेश पाटील, राजेश म्हात्रे यासह माजी नगरसेवक व मनसैनिक उपस्थित राहणार आहेत. याआधी मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा डोंबिवतील डी एन सी मैदान व पश्चिमेकडील कान्होजी जेधे (भागशाळा) मैदान येथे पार पडली होती.
या सभेतील नागरिकांची गर्दी ही इतर राजकीय पक्षातील नेते मंडळीच्या जाहीर सभे पेक्षा जास्त असून ती डोंबिवलीत रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती. यावेळीही राज ठाकरे यांच्या जाहीर सभेत रेकॉर्ड ब्रेक गर्दी होण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा