BREAKING NEWS
latest

महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचाराला कल्याण ग्रामीण मतदारसंघात उस्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-रिपाइं महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या निवडणूक प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये राजेश मोरे यांनी गेल्या दोन दिवसांपासून मतदारांच्या वैयक्तीक गाठीभेटीवर भर देण्यात येत असून मतदार पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारलाच पसंती देतील असा विश्वास त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना  व्यक्त केला आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यापासून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज मतदारसंघातील रेल्वे समांतर रस्ता कचोरे गाव येथील गावदेवीचे दर्शन घेत आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. वाजत गाजत निघालेल्या या पदयात्रेच्या माध्यमातून या भागातील कशिष गॅलेक्सी, पारिजात, हनुमान मंदिर, श्रीकृष्ण नगर, नगरसेविका रेखा चौधरी यांचे जनसंपर्क कार्यालय, लोकग्राम, चक्कीनाका, नगरसेवक मोरेश्वर भोईर यांचे कार्यालय करून पुढे भाल गाव येथील गणेश म्हात्रे यांच्या घराजवळ या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. राज्यात असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे महायुतीचे सरकार अत्यंत वेगाने प्रगती करत आहे. आमच्या सरकारने राज्यातील विद्यार्थी, महिला, युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह गोरगरीब जनतेसाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत. त्यामुळे जनता पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारला निवडून देईल असा विश्वास राजेश मोरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

या प्रचारावेळी महायुती उमेदवार राजेश मोरे यांच्यासह मनोज चौधरी, कविता गावंड, प्रमिला चौधरी, किरण मोंडकर, रश्मी गव्हाणे, राजन चौधरी, राहुल म्हात्रे आणि अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत