डोंबिवली : विधानसभा निवडणूक मतदान तारीख जवळ येत असतानाच रवींद्र चव्हाण यांचा त्यांच्या मतदारसंघात जनादर वाढतोय. डोंबिवली शहर भाजप महायुती राष्ट्रहिताच्या विचारांनी जोडले गेले आहेत. त्यामुळेच भाजप - महायुतीला डोंबिवलीकरांचा उदंड आणि उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
डोंबिवली पश्चिम येथील सम्राट चौक येथे भाजप - महायुतीचे उमेदवार मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रचारार्थ चौक सभा पार पडली. त्या चौक सभेला देखील डोंबिवलीकरांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. "डोंबिवलीत कमळचं फुलणार" असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला. येथील मतदार आपली संस्कृती, परंपरा कायम ठेवून इतिहास रचतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. मतदानाचाही तारिख जसजशी जवळ येतेय तसा चव्हाण यांचा जनादर वाढत चालला आहे. अनेक संस्थांनी त्यांच्या समर्थनार्थ स्वतःहून पाठिंबा जाहीर केले आहेत.
भाजप भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजी आव्हाड, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव मिहिर देसाई, मितेश पेणकर, सिद्धार्थ शिरोडकर, भाजपा उत्तर भारतीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश सचिव ऍड. बिंदू दुबे, युवा सेना शहर पदाधिकारी राहुल म्हात्रे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सुनिल फळदेसाई, आरपीआय शहर अध्यक्ष किशोर मगरे, आरपीआय शहर सचिव समाधान तायडे, युवा सेना सचिव कौस्तुभ फडके, ओमकार खेर, शिवसेनेच्या रश्मीताई गव्हाणे आदी वक्त्यांनी यावेळी आपली मतं मांडली.
या चौक सभेला भाजपा पश्चिम मंडल अध्यक्ष समीर चिटणीस, उपाध्यक्ष हरीश जावकर, नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, पवन पाटील, समीर सुर्वे, कृष्णा पाटील, कृष्णा परुळेकर, मनीषा राणे, राहुल सकपाळ, शैलेश देशपांडे, स्वानंद भणगे, सीताराम कदम आदी भाजपा कार्यकर्ते तसेच संजय पावशे, राहुल म्हात्रे, सागर जेधे, कौस्तुभ फडके आदी शिवसैनिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा