डोंबिवली : मागील एक महिन्यापासून प्रचारानिमित्त प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोहचलो. राजूदादांनी आपल्या मतदारसंघात आतापर्यंत केलेली सर्व कामे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. राजूदादा आमदार होते परंतु सत्तेत नव्हते तरीही त्यांनी रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न मार्गी लावले. कोरोना काळातील त्यांनी केलेले काम खरंच उल्लेखनीय होते. अनेक सामाजिक संस्था, धार्मिक संघटनांनी त्यांच्या कामाची पोहचपावती म्हणून धर्म, पक्ष, राजकीय विचारधारा न पहाता जाहीरपणे पाठिंबा दिला व आपले अमूल्य मत राजूदादांना दिले.
सर्वच ठिकाणी राजूदादांचा बोलबाला होता अगदी विरोधी पक्षांनी प्रामाणिकपणे याची कबुली देखील दिली होती. राजूदादा निवडून येणार यात कोणतेच दुमत नव्हते परंतु शेवटच्या काही दिवसांमध्ये सत्याधाऱ्यांकडून झालेला पैशांचा पाऊस, स्वपक्षीय, मित्रपक्ष व विरोधी पक्ष जे दादांसाठी मैदानात येऊन उभे राहिलेत किंवा बाहेरून पाठिंबा दिला अशा लोकांच्या तडीपाऱ्या यामुळे काही प्रमाणात खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. तरीही स्वपक्षीय, मित्रपक्ष व विरोधी पक्ष सर्वांनी न डगमगता राजूदादांसाठी काम केले त्यामुळे राजूदादा निवडून येणे हे स्वाभाविक होते यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि अजून काही षडयंत्र करता येऊ शकते का यावर कार्यप्रणाली कामाला लावली असेल याबाबत शंका निर्माण होते.
याचेच उदाहरण म्हणजे मतदानाच्या दिवशी वापरात आलेल्या ईव्हीएम मशीन आहे. ज्या ईव्हीएमचा वापर मतदानासाठी सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत झाला त्या ईव्हीएम मशीन मतमोजणीच्या दिवशी म्हणजे चार दिवसानंतरही ९९% चार्ज कशा राहिल्या ? असा सवाल उपस्थित होतो. साधारण ११ तास मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीनचा वापर झाला त्या अनुषंगाने त्याची बॅटरी ४० ते ५० टक्के तरी संपणे आवश्यक होते, परंतु मतदान केंद्रावर मतमोजणीच्या वेळेस बऱ्याच प्रतिनिधींच्या ही बाब लक्षात आल्यानंतरही लेखी निवेदन देऊनही निवडणूक आयोगाने यावर कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही. त्यामुळे या सर्वच प्रक्रियेवर खूप मोठे प्रश्न चिन्ह निर्माण होते ? सर्वच थरांमधून पाठिंबा असूनही सत्ताधारी पक्षाचा उमेदवार आणि राजू दादांमध्ये ६६ हजार ३९६ मतांचा फरक हीच गोष्टच पचनी पडत नाहीये."ईव्हीएम चा झोल" हेच या विजया मागील गमक दिसून येते यात तिळमात्र शंका नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा