मुंबई : निवडणूक आयोगाने महासंचालकपदी असलेल्या रश्मी शुक्ला यांची नुकतीच बदली केली होती. त्यांच्या जागी आता महाराष्ट्राचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून निवड झाली आहे. सध्या ते डीजीपी (कायदेशीर आणि तांत्रिक) म्हणून कार्यरत आहेत. रश्मी शुक्ला यांनी निवडणूक आयोगाने बदली केल्यानंतर संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुका असल्यामुळे संजय वर्मा तात्काळ पदभर स्वीकारतील, अशी माहिती समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली होती. काँग्रेस नेते नाना पटोलेंसह विरोधकांकडून रश्मी शुक्ला यांची निवडणुकीपूर्वी बदली करावी अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सकारात्मक
प्रतिसाद देत रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली करण्यात आली होती.
यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची वर्णी लागणार याची सातत्याने चर्चा रंगली होती. अखेर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्लांच्या बदलीनंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी नवीन महासंचालकांच्या नियुक्तीसाठी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश दिले होते. यात मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी संजय वर्मा आणि रितेश कुमार या तीन नावांचा समावेश होता. अखेर आज वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा