डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी तर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार सुभाष भोईर यांच्या निवडणूक प्रचाराची रॅली १४ गावातून काढण्यात आली. त्यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक ४५ मधील प्रकाश चौधरी व प्रभाग समिती ४४ मधून व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वसंत भानुशाली त्याचप्रमाणे बामर्ली गावचे परशुराम गायकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला त्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले.
१४ गावातील बाळे, वडवली, नारीवली, वाकळण, बामर्ली, निघू, नागाव या गावांमध्ये काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केणे, कॉग्रेस पक्षाचे कल्याण ग्रामीण अध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक हिरा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, विभाग प्रमुख बाळाराम पाटील, हनुमान महाराज पाटील, वडवली गावचे अरुण पाटील, राम भोईर, माजी सरपंच परेश ठक्कर, विभाग संघटिका सपना यंदारकर, बळी पाटील, उपविभाग प्रमुख अशोक जाधव यांच्यासह सर्व शाखाप्रमुख, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा