BREAKING NEWS
latest

नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी जनतेने निवडून दिलेल्याच्या आशीर्वादाबद्दल मानले जनतेचे आभार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : विधानसभा कल्याण ग्रामीण १४४ मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय महायुतीचे शिवसेना गटाचे अधिकृत उमेदवार राजेश मोरे यांचा ६६४९६ मतांनी दणदणीत विजय झाला असून कल्याण ग्रामीण मतदार संघातील जनतेने आपल्यावर विश्वास ठेऊन आपल्याला मतदान करून निवडून दिल्याचा आशीर्वाद दिला आहे त्याबद्दल त्यांचा मी खुप आभारी आहे, मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला आशीर्वाद देत दिलेली उमेदवारी आणि राज्यातील जनतेसाठी राबविलेल्या लाडकी बहिण सारख्या लोकोपयोगी छोट्या मोठ्या योजना लोकांच्या उपयोगी ठरल्या आहेत. या योजनांवर विश्वास ठेवत आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या ग्रामीण मतदार संघात केलेल्या विकास कामावर विश्वास ठेऊन या जनतेने प्रचंड मोठा आशीर्वाद आपल्याला दिला आहे त्या सर्व मतदारांचे आणि शिवसैनिक कार्यकर्ते यांचे आपण आभार मानतो अशा शब्दात कल्याण ग्रामीणचे नव निर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी आपल्या भावना प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केल्या.
                                            


कल्याण ग्रामीण १४४ च्या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या राजेश मोरे यांना या मतदार संघातून तब्बल १ लाख ४१ हजार १६४ मतदारांनी मोरे यांच्या बाजूने कौल दिल्याने मोरे यांना ६६३९६ मताचे मताधिक्य मिळाले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना राजेश मोरे यांच्या विजयाची अधिकृत माहिती मिळताच विजयी मिरवणूक काढत आमदार राजेश मोरे यांचे अभिनंदन केले. पेंढारकर महाविद्यालयापासून काढण्यात आलेल्या विजयी रॅलीवर जागोजागी गुलाल आणि बुलडोझर मधून फुलाची उधळण करत मतदार आणि कार्यकर्त्यांनी राजेश मोरे यांना शुभेच्छा दिल्या.


सामान्य कार्यकर्ता घासून पुसून नव्हे तर ठासून जिंकून आला - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे 

दरम्यान यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हा कल्याण ग्रामीणच्या जनतेचा विजय आहे, आम्ही मागील १० वर्षे या भागात केलेल्या कामाचा विजय आहे. मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे यांनी मागील अडीच वर्षे केलेल्या लोकोपयोगी कामाचा हा विजय आहे. एक सामान्य कार्यकर्ता घासून पुसून नव्हे तर ठासून जिंकून आला आहे. महायुतीने मागील अडीच वर्षात केलेल्या कामामुळे मोठे यश महाराष्ट्रात महायुतीला  मिळाले आहे. जनतेने एकतर्फी विजय महायुतीला दिला आहे. महायुतीच्या झंजावतापुढे महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत