BREAKING NEWS
latest

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील २७ गावं आणि १४ गावांतील जटिल पाणीप्रश्न लवकरच सुटणार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावं आणि २७ गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणारा पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, नवनियुक्त आमदार श्री.राजेश गोवर्धन मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज एमआयडीसी विभागाचे सीईओ व सदस्य सचिव श्री.पी.वेलारासू यांची भेट घेतली. सदर बैठकीत १४ गावं आणि २७ गावांमधील पाणीपुरवठ्याच्या समस्येवर झालेल्या सखोल चर्चेनुसार सदरचा पाणी प्रश्न पुढील कालावधीत लवकरात लवकर कायमस्वरूपी सोडवण्यात येणार आहे. या चर्चेमुळे शिष्टमंडळासह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिष्टमंडळाच्या बैठकीत शिवसेना विधानसभा संघटक श्री.बंडू पाटील, ज्येष्ठ समाजसेवक व शिवसैनिक श्री.दत्ता वझे, उप-तालुकाप्रमुख श्री.गणेश जेपाल, उप-तालुकाप्रमुख श्री.विकास देसले, विभाग प्रमुख श्री.किसन जाधव, विभागप्रमुख श्री.अनिल म्हात्रे, श्री.हितेश गांधी आदी मान्यवरांचा समावेश होता.
आमदार श्री.राजेश गोवर्धन मोरे यांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी घेतलेली ही तातडीची कृती नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. या प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न १४ गावं आणि २७ गावांना पुरेसा व मुबलक पाणीपुरवठा मिळवून देण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत