डोंबिवली - मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा भगवत गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. सुमारे पाच हजार वर्षापूर्वी श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनला रणभूमीवर जीवनविषयक संदेश दिला व 'श्रीमद भगवत गीता' लिहिली गेली. हिंदू धर्मातील श्रीमद भगवत गीता हा जन माणसातील अमूल्य उपदेश ठेवा आहे. 'जे एम एफ' शिक्षण संस्था अंतर्गत जन गण मन इंग्लिश शाळा आणि विद्यामंदिर मध्ये देखील गीता जयंती उत्साहाने व धार्मिकतेने साजरी करण्यात आली. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी भगवत गीते मधील काही अध्याय कथन करून शिक्षिका सौ.श्रेया कुलकर्णी, सौ. आरती वैद्य व भक्ती पुरोहित यांनी त्याचा अर्थही समजाऊन सांगितला.
'हरे राम हरे कृष्ण' इस्कॉन मंदिरातील व्यवसायाने सनदी लेखापाल (सीए) असलेले अध्यात्मिक गुरू प्रभू श्री.सुदामा दास जी व त्याच बरोबर प्रभुजिंचे अध्यात्मिक शिष्य सहकारी यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. जे एम एफ संस्थेचे संस्थापक माननीय डॉ.राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ.प्रेरणा कोल्हे यांनी सर्व गुरूंचे शाल श्रीफळ व चांदीची लक्ष्मी देऊन स्वागत केले. सरस्वती पूजन व भगवत गीता पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम प्रभूजींनी 'गीते' बद्दल माहिती सांगून "हरे रामा हरे कृष्णा" चे उच्चारण केले. मधुबन वातानुकुलीत दालनांत जवळपास शाळेच्या इयत्ता सातवी ते दहावीची २५० विद्यार्थी तसेच १०० शिक्षक उपस्थित होते. सर्व मुलांनी भगवत गीता बद्दल सांशक प्रश्न विचारून प्रभूजींकडून समाधानकारक उत्तरे मिळवली. तदनंतर प्रभू श्री सुदामा दास व त्यांचे शिष्य या सर्वांनी मिळून टाळ मृदुंगाच्या गजरात 'हरे रामा हरे कृष्ण' चे कीर्तन करून सर्व विद्यार्थ्यांना कीर्तनात सामावून घेतले, सर्व विद्यार्थी तल्लीन होऊन कीर्तनात थिरकत होते. 'हरे रामा हरे कृष्णा' च्या गजराच्या लहरी सर्वत्र ठिकाणी लहरत होत्या.
ज्याप्रमणे रणभूमीवर अठरा दिवस घनघोर युद्ध सुरू होते त्याच वेळी सृष्टीचा पालनकर्ता 'शारंगपाणी' हा धनुर्धारी धनंजयाला जीवन उपदेश करत होता, त्या जीवानचा सार तुम्हा आम्हाला चाखता आला ते म्हणजे केवळ भगवत गीते मुळेच. छल, कपट, निंदा ह्या पलीकडे जाऊन देखील एक शांततेचा मार्ग आहे आणि तो म्हणजे अध्यात्म, असे संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे यांनी मुलांना सांगितले. 'हरे राम हरे कृष्णा'च्या गजराने आपले मन पवित्र झाले तर अध्यायन आणि अध्यात्म यांचा निकटचा संबंध आहे म्हणून दोन्हीकडे लक्ष केंद्रित करून 'आत्मसात' करणे हेच महत्वाचे आहे असे संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना सांगितले. सर्व विद्यार्थी शिक्षकांना निःशुल्क भगवत गीता प्रदान करून गीता जयंतीचा प्रसाद देण्यात आला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा