BREAKING NEWS
latest

अग्निशस्त्रासह दरोडा टाकणाऱ्या टोळीस गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक, ठाणे शहर यांनी ₹. २१,९७,६११ मुद्देमाल हस्तगत करत केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : राबोडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०५/१२/२४ रोजी २३:३० वाजण्याच्या  सुमारास फिर्यादी श्रीमती.सुनिता सिल्वराज पिल्ले (वय: ४५ वर्षे) राहणार. उल्हासनगर-४ या मुंबई येथे जात असताना त्यांच्या गाडीचा पाठलाग करून नाशिक-मुंबई हायवे मुंबई लेनवरील कॅडबरी जंक्शनजवळील ब्रीजच्या चढणीवर ठाणे पश्चिम येथे आल्या असताना त्यांची कॅब कार अडवुन त्यांना 'पुलिस और कस्टम पीछेसे आ रहे, आप गाडी रोको' अशी बतावणी करून, तसेच कॅब चालकाला 'आप गाडी बंद करे' असे धमकावुन, कॅब थांबावुन, आरोपी इसमांनी फिर्यादीच्या डाव्या बाजुचा दरवाजा जबरदस्तीने उघडून, फिर्यादी प्रतिकार करत असतानाही त्यांनी फिर्यादीच्या सीटवरील दोन बॅग त्यामध्ये ५०,०००/- सौदी रियाल (भारतीय चलनातील ११,२९,०००/- रूपये) व भारतीय चलनातील १ लाख रूपये असे एकुण १२ लाख २९ हजार रूपये जबरीने चोरून पळुन गेले म्हणुन राबोडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं ९४९ /२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२), ३०९(६), ३(५), ४९, सह भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ३,२५,सह म.पो.का.कलम ३७(१)१३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठांनी सदरचा गुन्हा उघडकिस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. त्यांच्या  सुचनेप्रमाणे खंडणी विरोधी पथकाकडुन विशेष पथक तयार करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा समांतर तपास राबोडी पोलीस ठाणे व खंडणी विरोधी पथक असे एकत्रितपणे चालु होता. सदर गुन्ह्यातील आरोपीं बाबत कोणतेही धागेदोरे व सुगावा नसताना तांत्रिक विष्लेषणाव्दारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत अतिशय कौशल्यपुर्व आरोपींचा तपास करून आरोपी १) मोहीत हेमंत हिंदुजा (वय: १९ वर्षे), राहणार, उल्हासनगर-३, जि. ठाणे, २) वरूण नरेश होटवानी, (वय: २० वर्षे) राहणार उल्हासनगर-३, जि. ठाणे, ३) रोहन सतिश रेडकर उर्फ बाबु (वय: १९ वर्षे) राहणार उल्हासनगर-३, जि. ठाणे. ४) स्वप्नील दिलीप ससाणे उर्फ बाबुराव (वय: २२ वर्षे), धंदा: बेकार, राहणार बॅरेक नं. ३०, रूम नं.२, जयलक्ष्मी सोसायटी समोर, एसईएस शाळेचे पाठीमागे, उल्हासनगर-१, जि. ठाणे. ५) अन्वर सुबानी शेख, उल्हासनगर-१, जि. ठाणे व महीला आरोपी ६) निता विष्णु मनुजा उर्फ भक्ती (वय: ४० वर्षे), कल्याण (प) जि.ठाणे व ७) विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेवुन त्यांच्या कडुन दरोडा टाकुन जबरी चोरी केलेली रक्कम तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहन मारूती कंपनीची इर्टिगा कार, होन्डा शाईन, सुझुकि कंपनीची एक्सेस
मोटारसायकल, २० मोबाईल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले अग्निशस्त्र गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस व मोबाईल फोन असा एकुण २१,९७,६११/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्यांची दि. १९/१२/२०२४ रोजी पर्यंत रिमांड पोलीस कोठडी आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे, मा.अपर पोलीस आयुक्त श्री. पंजाबराव उगले, मा.पोलीस उप-आयुक्त श्री. अमरसिंह जाधव, मा.सहा. पोलीस आयुक्त शोध-१ (गुन्हे) तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक श्री.शेखर बागडे, मा.सहा.पोलीस आयुक्त शोध-२ (गुन्हे) श्री. राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. नरेंद्र पवार, सपोनिरी. सुनिल तारमळे, श्रीकृष्ण गोरे, भुषण कापडणीस, पोउपनिरी. विजयकुमार राठोड, सुभाष तावडे, सपोउनि. संजय बाबर, संदिप भोसले, पोहवा. दिपक गडगे, आशिष ठाकुर, संजय राठोड, सचिन शिंपी, योगीराज कानडे, अभिजीत गायकवाड, मपोहवा. शितल पावसकर, पोना. रविंद्र हासे, पोशि. अरविंद शेजवळ, तानाजी पाटील, संतोष वायकर, मपोशि. मयुरी भोसले, चापोना. भगवान हिवरे यांनी यशस्वीपणे केलेली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत