BREAKING NEWS
latest

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात “अल्पसंख्याक हक्क दिवस” उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे, दि.१८: संयुक्त राष्ट्राने दि.१८ डिसेंबर १९९३ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्विकृत करुन प्रस्तुत केला आहे. त्यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावे तसेच या बाबतच्या वैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी, यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सूचनेनूसार या दिवसाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी श्री.वैभव कुलकर्णी यांनी अल्पसंख्याक हक्क दिनाचे महत्व समजावून सांगितले. 
    
या कार्यक्रमास सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्री.भरत साळुंखे, मानव विकास विभागाचे अधिकारी श्रीमती दिपाली भोये, लेखा अधिकारी श्रीमती स्मिता नि. पट्टेकर, अल्पसंख्याक कक्षातील सांख्यिकी सहायक श्री. सुनिल नाडेकर, महसूल सहायक श्रीमती शितल जाधव व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत