डोंबिवली : डोंबिवली जिमखाना येथे दिनांक २१ ते २९ दरम्यान २७ व्या वर्षात पदार्पण करत सुरू होत असलेल्या 'उत्सव २०२४' चे उद्घाटन 'महाराष्ट्र टाईम्स'चे निवासी संपादक श्री. समीर कर्वे यांच्यासह डोंबिवली जिमखानाचे अध्यक्ष दिलीप भोईर, सचिव पर्णाद मोकाशी, खजिनदार आनंद डिचोलकर, सुवर्णा वाघ आणि सर्व जिमखाना सदस्य आणि तमाम डोंबिवलीकरांच्या साक्षीने शानदार उद्घाटन सोहळा पार पडला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे, हे सर्वजण विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आणि मंत्रिमंडळ विस्तारात व्यस्त असल्या कारणाने या उत्सव उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. डोंबिवलीकरांचे लाडके आमदार रवींद्र चव्हाण यांनी आपले डोंबिवलीवरचे प्रेम कायम ठेवत डोंबिवली जिमखाना 'उत्सव २०२४' ला व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे भरभरून शुभेच्छा दिल्या.
डोंबिवली जिमखाना उत्सव चे ब्रीदवाक्य 'सर्वांसाठी सर्वकाही'
याच उद्देशाने या उत्सव यात्रेत उद्योजकांना उत्तेजन देण्यासाठी अनेक प्रकारचे स्टॉल, मनोरंजन, क्रीडा, खाद्य जत्रा, बँका आणि रियल इस्टेट त्याचप्रमाणे बाळ गोपाळ यांच्या स्पर्धा मनोरंजन अगदी लहानांपासून जेष्ठांपर्यंत सर्वांसाठी सर्वकाही असणाऱ्या जिमखाना उत्सव यात्रेत डोंबिवली कल्याण आणि ग्रामीण भागातून एवढेच ठाणे मुंबई येथून सुद्धा अनेक उत्सव प्रेमी या डोंबिवली जिमखानाच्या उत्सवाला आपली हजेरी लावत असतात आणि काही ना काही वस्तू घेऊन जात असतात आणि तोच आनंद वर्षभर आपल्या गाठीशी साठवून पुढल्या वर्षाची वाट पाहत असतात असा हा सर्वांनाच हवा असणारा डोंबिवली जिमखाना उत्सव संपूर्णपणे यशस्वी करण्यासाठी जिमखानाचे सर्व सदस्य, पोलीस, अग्निशामक दल तसेच ऍम्बुलन्स सेवा सज्ज असतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा